Join us  

'कोण होणार करोडपती'चे सूत्रसंचालक करणार चक्क आयपीएलचं समालोचन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 6:20 PM

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती'चा येत्या २९ मे पासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता पासून सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

सोनी मराठी वाहिनीने प्रेक्षकांना पुन्हा एकदा करोडपती (Kon Honar Crorepati) होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. आता मागे नाही राहायचं असं सांगत 'कोण होणार करोडपती' हा लोकप्रिय कार्यक्रम स्पर्धकांसाठी आता एक नाही तर तब्बल २ करोड रुपये जिंकण्याची संधी घेऊन आला आहे. हो, हे खरंय म्हणजेच 'कोण होणार करोडपती' कार्यक्रमात आता बक्षिसाची रक्कम डबल झाली आहे.  प्रश्नोत्तराच्या या मनोरंजक खेळात सुप्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांचे दमदार निवेदन आणि दिलखुलास संवाद कौशल्य प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. तर आता मागे नाही राहायचं असं ब्रीददवाक्य घेऊन येत आहे. 'कोण होणार करोडपती'चा  येत्या २९ मे पासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता पासून सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. कोण होणार करोडपतीचे निवेदक सचिन खेडेकर एका वेगळ्या मंचावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सगळीकडे सध्या क्रिकेटचे फिव्हर आहे. IPL चा फिनाले उद्या असून सगळीकडे त्याची चर्चा आहे. सोबतचं कोण होणार करोडपती सुरु होत आहे त्याची देखील सगळीकडे चर्चा आहे. पण ह्या दोनी मनोरंजक  एकत्र येणार आहेत. ते कसा म्हणजे उद्या कोण होणार करोडपती चे सूत्रसंचालक सचिन खेडेकर जिओ सिनेमा वर चक्क कॉमेन्टरी आहेत. सचिन खेडेकर हे स्वतःच क्रिकेट चे फार मोठे चाहते आहेत. त्यामुळे मराठी समालोचकांसोबत त्यांच्या गप्पा सुरेख रंगतील यात काही वाद नाही. हा योग जुळून येणार आहे २८ मे रोजी संद्याकाळी ६ वाजल्यापासून. किरण मोरे, धवल कुलकर्णी आणि केदार जाधव या सहसमालोचकांसोबत सचिन खेडेकर कसे कॉमेन्टरी करतील आणि कोण होणार करोडपती चा खेळ या तुफान क्रिकेटवीरांसोबत खेळतील का हे पाहणे देखील मजेशीर असेल. त्यामुळे प्रेक्षकांसाठी दुप्पट मनोरंजन असेल यात काही वाव नाही. असाच प्रकारचे दुप्पट मनोरंजन आपल्याला पाहायला मिळणार आहे कोण होणार करोडपती या कार्यक्रमात. 'कोण होणार करोडपती'चा  येत्या २९ मे पासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वा. पासून सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :सचिन खेडेकर