Join us

मडोना म्हणतेय, संगीतच जगण्याचा आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2017 21:50 IST

पॉप जगताची मल्लिका मडोना हिने पक्का निश्चय केला असून, तिला आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत संगीतामध्ये स्वत:ला सामावून घेण्याचे आहे. कारण ...

पॉप जगताची मल्लिका मडोना हिने पक्का निश्चय केला असून, तिला आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत संगीतामध्ये स्वत:ला सामावून घेण्याचे आहे. कारण तिला तिच्यातील कलेप्रती प्रचंड आदर असून, संगीतच जगण्याचा आधार असल्याचे ती म्हणते.  कॉण्टॅक्ट म्युझिकने दिलेल्या माहितीनुसार, ५८ वर्षीय पॉप गायिका मडोना असा कधीच विचार करीत नाही की, तिला आयुष्यात कधीही संगीताप्रतीची रुची कमी होईल. तिच्यात संगीताबद्दल असलेले प्रेम आणि आदर कधीच कमी होणार नाही. कदाचित याच कारणामुळे तिच्या पतीने तिला सोडले असावे असे मडोना म्हणतेय. याबाबत मडोना म्हणतेय की, हे खरोखरच दुसºयाला वेडेपणाचे लक्षण वाटेल; मात्र मला संगीताप्रतीचे असलेले प्रेम मी शब्दात कथन करू शकत नाही. माझ्यासाठी संगीत श्वासाप्रमाणे आहे. जर श्वास थांबला तर मनुष्याचे आयुष्य संपते तसेच माझ्यासाठी संगीत आहे. माझ्या आयुष्यातून संगीत दूर केल्यास माझे जगणे निरर्थक असेल. मुळात मी संगीतापासून दूर जाण्याचा विचारच करू शकत नाही. कारण संगीताव्यतिरिक्त जगण्याची मी कधी कल्पनाच केली नाही, असेही मडोना म्हणते. संगीताप्रती माझ्यात असलेली आत्मियता इतरांना खटकणारी आहे. माझ्या पतीला ही बाब अजिबात आवडत नसे. त्यामुळेच तो माझ्यापासून दूर गेला. परंतु त्याच्यासाठी मी संगीताला दूर केले नाही. जेव्हा त्याने घटस्फोटाचा निर्णय घेतला होता, तेव्हा त्याने मला त्यामागचे कारणही सांगितले होते. कदाचित मी संगीतापासून दूर गेले असते तर आज तो माझ्यासोबत असता. परंतु मी असे करू शकत नाही. संगीत माझा प्राण असून, त्यापासून दूर जाण्याचा माझ्यात कधीच विचार येणार नसल्याचेही मडोनाने सांगितले.