Join us  

ख्लो कर्दाशियाने चाहत्यांना दिला चक्क दम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2017 4:35 PM

रिअ‍ॅलिटी टीव्हीस्टार ख्लो कर्दाशिया नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असते. सोशल मीडियावर कधी हॉट फोटो शेअर करून तर ...

रिअ‍ॅलिटी टीव्हीस्टार ख्लो कर्दाशिया नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असते. सोशल मीडियावर कधी हॉट फोटो शेअर करून तर कधी वादग्रस्त विधान शेअर करून ती माध्यमांमध्ये झळकत असते. यावेळेस मात्र ती वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तिने शेअर केलेल्या फिटनेस व्हिडीओवर आक्षेप घेणाºया तिच्या चाहत्याला तिने चक्क स्नॅपचॅटवर दम दिला आहे. फिमेल फर्स्ट या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, आपल्या फिटनेसविषयी नेहमीच सतर्क राहणारी ख्लो तिच्या चाहत्यांसाठी स्नॅपचॅटवर व्हिडीओ शेअर करीत असते. यावेळेस तिने वर्कआउट करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला. मात्र तिच्या काही चाहत्यांना हा व्हिडीओ फारसा आवडला नाही. त्याने व्हिडीओला कमेंट शेअर करताना ख्लोवर टीका केली. त्याचबरोबर वर्कआउट करताना ख्लो कशी दिसतेय यावरही कमेंट केल्या. मात्र चाहत्यांच्या या कमेंट ख्लोच्या फारशा पचनी पडल्या नाहीत. तिने लगेचच त्याला रिप्लाय देत, मी स्नॅप्सवर लोकांना वर्क आउटविषयीच्या टीप्स फुकटात सांगतेय, मग लोकांना त्याचा एवढा का त्रास होतोय. मी लोकांना वर्कआउटविषयी जेव्हा सांगतेय तेव्हा काही लोकांच्या पोटात दुखतंय. त्यांच्याकडे प्रशिक्षक आणि प्रशस्त व्यायामशाळा असल्यानेच ते मला शिकविण्याचा प्रयत्न करीत असतात. अशा लोकांना मी सांगू इच्छिते की, त्यांनी एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवायला हवी. आम्ही घराबाहेर राहून फिटनेसचे धडे देत आहोत. मी तुम्हाला फक्त एवढेच सांगण्याचा प्रयत्न करीत आहे की, प्रशिक्षकाविना कसा व्यायाम करायला हवा. व्हिडीओमध्ये वर्कआउट करताना मी जे साहित्य वापरीत आहे, ते कुठेही अगदी तुमच्या घराबाहेर उपलब्ध आहे. त्यामुळे माझ्या वर्कआउटमध्ये तांत्रिक चुका शोधण्यापेक्षा किंवा टीका करण्यापेक्षा सकारात्मक बाजू समजून घ्या, असेही ख्लो म्हणाली. त्याचबरोबर जर तुम्हाला मी करीत असलेले वर्कआउट पचनी पडत नसेल तर मला तुमची फारशी चिंता नाही. यापुढे माझ्यावर टीका करण्याची हिम्मत करण्याअगोदर स्वत:चा विचार करा. कारण माझ्या संतापाचा पारा चढल्यास त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील, असाही दमही ख्लोने चाहत्यांना दिला. ख्लोचा हा अ‍ॅग्रेसिव्ह अवतार त्यांच्या चाहत्यांसाठी एकप्रकारे आव्हान देणारा असून, पुढच्या काळात तिच्या व्हिडीओला नकारात्मक कमेंट देताना तिचे चाहते चार वेळा विचार करतील, यात शंका नाही.