जेनेफर लॉरेन्स आणि क्रिस पॅटला यामुळे द्यायची आहे भारताला भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 16:52 IST
हॉलीवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री जेनिफर लॉरेन्स आणि गेल्या वर्षी ‘ज्युरासिक वर्ल्ड’च्सह बॉक्स आॅफिसचे रेकॉर्ड मोडणाऱ्या क्रिस प्रॅटला सध्या ...
जेनेफर लॉरेन्स आणि क्रिस पॅटला यामुळे द्यायची आहे भारताला भेट
हॉलीवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री जेनिफर लॉरेन्स आणि गेल्या वर्षी ‘ज्युरासिक वर्ल्ड’च्सह बॉक्स आॅफिसचे रेकॉर्ड मोडणाऱ्या क्रिस प्रॅटला सध्या भारताविषयी खूप प्रेम जागे झाले आहे. आम्हाला भारतात सुट्या घालविण्यासाठी यायचे असून येथील संस्कृती जाणून घेण्यासाठी लोकांना भेटायला आवडेल, अशी त्यांनी इच्छा बोलून दाखवली.जेनिफर म्हणाली की, ‘भारत हा खूप मोठा देश आहे. एकदा वेळ काढून तेथे जाण्यास मला आवडेल. तेथील संस्कृती, लोक, परंपरा याबद्दल खूप ऐकलेले आणि ते स्वत: अनुभवण्याची खूप उत्सुकतादेखील आहे. त्यामुळे लवकरच मी भारत भेटीवर जाण्याचा विचार करीत आहे.’ जेनिफर सध्या तिच्या आगामी ‘पॅसेंजर्स’ चित्रपटाच्या प्रचारामध्ये व्यस्त आहे.क्रिस पॅट आणि जेनेफर लॉरेन्स स्टारर ‘पॅसेंजर्स’ हा स्पेस अॅडव्हेंचर लव्ह स्टोरी चित्रपट आहे. क्रिस भारतात येण्याविषयी म्हणतो की, ‘मला खरं तर व्हॅकेशनसाठी भारतात यायचे आहे. भारत एवढा विशाल देश आहे की, कुठून सुरूवात करावी हेच मला कळत नाही. पण पुढची सुटी मी भारतात घालवणार एवढे मात्र नक्की.’ पॅसेंजर्स : जेनिफर लॉरेन्स आणि क्रिस प्रॅटभारतीय चित्रपटांविषयीदेखील क्रिसला माहिती आहे. तो म्हणतो, ‘हिंदी चित्रपटांतून मला थोडेफार भारतदर्शन झाले आहे. परंतु प्रत्यक्षात राहून पाहण्याचा अनुभवच काही वेगळा असतो. एखाद्या कामानिमित्त किंवा फिल्म प्रोमोशनऐवजी मला केवळ फिरायला भारतात यायचे आहे. त्याशिवाय मला तो देश कसा कळणार?’ ‘पॅसेंजर्स’मध्ये क्रिस आणि जेनिफर दोन अंतराळ प्रवाशांची भूमिका करीत असून दूरवरच्या एका ग्रहावर जाण्यासाठी ते १२० वर्षांच्या प्रवासाला निघालेले आहे. या प्रवासादरम्यान घडणाऱ्या कथानकावर सिनेमा आधारित आहे. अत्युच्च दर्जाचे व्हीएफएक्स इफेक्टस् यामध्ये पाहायला मिळणार. पुढील वर्षी ६ जानेवारीला हा चित्रपट भारतात रिलीज होणार आहे.