मद्यपान करीत नसल्याचे त्याने मात्र जोर देऊन सांगितले. शिवाय पोलिग्राफ टेस्टसाठी मी कधीही तयार असल्याचे त्याने स्पष्ट केले. दरम्यान, याप्रकरणी पोलीस तपास करीत असून, नेमके वास्तव काय? हे शोधण्याचे काम करीत आहेत. कार्टरच्या या भावुक वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांमध्ये एकच चर्चा रंगत आहे.}}}} ">I will NOT continue to tolerate such lies about me regarding drug use with alleged meth, heroine, crack - it's not funny!}}}} ">— Aaron Carter (@aaroncarter) July 17, 2017
अटकेमुळे भावुक झाला आरोन कार्टर; आरोप फेटाळले!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2017 19:42 IST
नशेत वाहन चालविणे अन् गांजा (मारिजुआना) सारखा अमली पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी अटकेत असलेला गायक आरोन कार्टरच्या अडचणीत वाढ होताना ...
अटकेमुळे भावुक झाला आरोन कार्टर; आरोप फेटाळले!!
नशेत वाहन चालविणे अन् गांजा (मारिजुआना) सारखा अमली पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी अटकेत असलेला गायक आरोन कार्टरच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. जेव्हा त्याला या प्रकरणी अटक करण्यात आली, तेव्हा तो खूपच भावुक झाल्याचे दिसून आले. आरोनने म्हटले की, मी कधीच मद्यपान करीत नाही, हे सिद्ध करण्यासाठी मी पोलिग्राफ टेस्ट करायला तयार आहे. कार्टरने इटीआॅनलाइन डॉट कॉम या वेबसाइटशी बोलताना म्हटले की, ‘वास्तविक मी ‘ओ ब्रदर वेयर दाउ आर्ट’ हे गाणं ऐकत होतो. अशात कोणीतरी म्हटले की, मी बेदरकारपणे कार चालवित होतो, हीच बाब पोलीस रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आली. परंतु वास्तविक असे काहीच घडले नाही. आपल्या अटकेविषयी सांगताना कार्टरने म्हटले की, ‘अटक होण्याअगोदर शुक्रवारी मी माझी पे्रयसी मॅडिसन पार्कर हिला भेटण्यासाठी एका क्लबमध्ये गेलो होतो. भाड्याची कार घेण्यापेक्षा एक स्वस्त कार विकत घेण्याचा आम्ही विचार केला होता. दरम्यान, पोलिसांनी कार्टरला जॉर्जियामधील आॅटोजोन परिसरात अटक केली. जेव्हा पोलिसांनी कार्टरला कारमध्ये काय आहे? असे विचारले. तेव्हा त्याने गांजा (मारिजुआना) असल्याचे सांगितले. यावेळी कार्टरने हादेखील दावा केला की, तो कधीही मद्यपान करीत नाही. मात्र कधी-कधी बिअर पित असल्याचे त्याने मान्य केले. परंतु हे मान्य करताना, एकांत, दु:ख विसरण्यासाठी अन् भूक वाढण्यासाठीच मी बिअर पीत असल्याचे त्याने आवर्जून सांगितले.