किक - साजिद नाडियादवाला दिग्दर्शित या चित्रपटाने २३३ कोटी रुपयांची कमाई केली आहे
हॅप्पी न्यू इयर- तगडी स्टारकास्ट असलेला फराह खान दिग्दर्शीत या चित्रपटाने २०३ कोटी ३० लाख रुपयांचा गल्ला आत्तापर्यंत जमवला आहे.
बँग बँग - हृतिक आणि कॅटरीना कैफने पहिल्यांदाच एकत्रीत अभिनय केलेला चित्रपट बँगबँगने १८१ कोटी ३ लाखांची कमाई केली आहे.
सिंघम रिटर्न्स या चित्रपटाकडून फार अपेक्षा असताना रोहित शेट्टीने या चित्रपटाच्या माध्यमातून १४१कोटी रुपयांची कमाई केली आहे.
हॉलिडे - सोनाक्षी आणि अक्षय सह दहशतवादाचा गंभीर विषय या चित्रपटातून ए.आर. मुरुगादोस या दिग्दर्शकाने मांडला होता. त्याला फारसे यश आले नसले तरी ११२.६५ कोटी रुपयांचा गल्ला या चित्रपटाने जमवला आहे.
जय हो - सलमानचा भाऊ सोहेल ने दिग्दर्शीत केलेल्या चित्रपटाने १११ कोटी रुपयांचा गल्ला जमवला असला तरी तो लोकप्रिय झाला नाही.
एक व्हिलन - सिद्धार्थ मल्होत्रा व श्रद्धा कपूर हे नवे चेहरे घेऊनही मोहित सुरी या दिग्दर्शकाने १०५.५० कोटींची कमाई केली. तसेच हा चित्रपट सुपरहिट ठरला.
२ स्टेट्स - चेतन भगतच्या कथेवर आधारीत या चित्रपटाने १०४ कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटात आलिया भट्ट आणि अर्जून कपूर यांची जोडी चांगलीच गाजली.