Join us

‘तेवर’ महत्त्वाचा

By admin | Updated: December 29, 2014 23:30 IST

पश्चिम बंगालच्या सुब्रत दत्ताने बंगाली चित्रपटांत काम केल्यानंतर त्याला हिंदी चित्रपटसृष्टीत संधी मिळाली.

पश्चिम बंगालच्या सुब्रत दत्ताने बंगाली चित्रपटांत काम केल्यानंतर त्याला हिंदी चित्रपटसृष्टीत संधी मिळाली. ‘रोर... द टायगर आॅफ सुंदरबन’, ‘शौकिन्स’, ‘टँगो चाली’, ‘तलाश’, ‘भूतनाथ रिटर्न्स’ अशा चित्रपटांत त्याने काम केले आहे. ४० नाटकांत काम केल्यानंतर चित्रपटांकडे वळलो. नंतर बंगाली, हिंदी, भोजपुरी, तमीळ व तेलगू या भाषांतील चित्रपट केले. नायक, खलनायक अशा दोन्ही भूमिका केल्या. मात्र व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण भूमिका तेवरमध्ये आहे, असे सुब्रत सांगतो. विनोदी आणि काहीशा नकारात्मक भूमिकेत सुब्रत प्रेक्षकांसमोर येणार आहे. अर्जुन कपूर, सोनाक्षी सिन्हा, मनोज वाजपेयी, राकेश शर्मा यांच्याही त्यात प्रमुख भूमिका आहेत. सुब्रत यात काकडीची भूमिका करीत आहे.