Join us

येतोय स्टोरी हाय पण खरी हाय

By admin | Updated: December 19, 2014 09:00 IST

प्रेमाची वेगवेगळी रुप दर्शवणारा स्टोरी हाय पण खरी हाय हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

प्रेमाची वेगवेगळी रुप दर्शवणारा स्टोरी हाय पण खरी हाय हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आशिष भेलकर दिग्दर्शित या चित्रपटामध्ये वेगवेगळ्या वयात बदलत जाणारी प्रेमाची कथा सांगितली आहे. या चित्रपटाचा मुहुर्ताचा सीन नुकताच राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक मधूर भांडारकर यांच्या हस्ते झाला. चित्रपटात अनिकेत विश्वास राव यांची प्रमुख भुमिका आहे. राम गोपाल वर्मा, सुधीर  मिश्रा व मधूर भांडारकर यांच्या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते असलेले संजय मेहता यांची ही पहिलीच निर्मिती आहे. अनिकेत विश्वास राव याची यात प्रमुख भुमिका आहे.