Join us

अजयने रविना टंडनबद्दल वापरले होते 'हे' धक्कादायक शब्द

By admin | Updated: February 7, 2017 11:03 IST

अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री रविना टंडन दोघेही आज आपआपल्या संसारात सुखी आहेत. पण 1990 च्या दशकात या जोडीची बरीत चर्चा झाली होती.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 7 - अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री रविना टंडन दोघेही आज आपआपल्या संसारात सुखी आहेत. पण 1990 च्या दशकात या जोडीची बरीत चर्चा झाली होती. 90 च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींबरोबर अजयचे नाव जोडले जायचे. त्यात रविना टंडनचा समावेश होता. 
 
अजय-रविना जोडीने त्यावेळी दिव्य शक्ती (1993), दिलवाले (1994), एक ही रस्ता (1993) आणि गैर (1999) या चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यावेळी या जोडीच्या प्रेम प्रकरणाची माध्यमांमध्ये जोरदार चर्चा होती. या दोघांमधील जवळीक वाढत असल्याच्या चर्चा सुरु असताना एका मुलाखतीत रविनाने काही विधाने केली. 
 
त्यावर अजय देवगण इतका खवळला होता की, त्याने रविनाबद्दल अत्यंत नकारात्मक शब्द वापरले होते. रविनाच्या हातून काही चित्रपट निसटले यासाठी तिने करिष्मा कपूरला जबाबदार धरताना त्यात अजयचाही उल्लेख केला होता. 1993-94 मध्ये अजयने करिष्मा कपूरबरोबरही अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. 
 
रविनाने केलेल्या वक्तव्यावर बोलताना अजय म्हणाला की, रविनाच्या विधानाला जास्त महत्व द्यावे असे मला वाटत नाही. पण यावेळी तिने सर्व मर्यादा ओलांडली आहे. ती खोटे बोलतेय. मी तिला मानसोपचार तज्ञाकडे जाऊन डोके तपासण्याचा सल्ला देईन. असे शब्द अजयन एकेकाळी रविनाबद्दल वापरले होते.