झी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘जोधा अकबर’ने ४०० एपिसोड नुकतेच पूर्ण केले. यानंतर मालिकेत आता बदल करण्यात येत असून कथानक सात वर्षांनी पुढे गेल्याचे दाखविण्यात येत आहे. यापुढे जोधा-अकबरचा पुत्र सलीम याला केंद्रबिंदू करण्यात येत असून अनारकलीच्या भूमिकेसाठी हीना परमारची निवड करण्यात आली आहे. ‘अशा ऐतिहासिक भूमिकेत मी प्रथमच काम करणार आहे. त्यातही सौंदर्यवती अनारकलीची भूमिका साकारणे थोडे अवघड असले तरीही मला त्याचा आनंद आहे,’ असे हीना सांगते.
हीना बनणार अनारकली
By admin | Updated: December 26, 2014 00:23 IST