Join us  

रेशम टिपणीसच्या मुलीला पाहिलंय का? ग्लॅमरच्या बाबतीत इतर अभिनेत्रींनाही देते टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 7:08 PM

सोशल मीडियावर रेशमच्या (Resham Tipnis) लेकीचेही फोटो पाहायला मिळतात. रेशमच्या लेकीचे नाव रिशिका असे आहे.

हिंदी आणि मराठी सिनेमा तसंच मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी रेशम टिपणीसचा (Resham Tipnis) प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. छोटा पडदा गाजवणारी रेशम बिग बॉस मराठीच्या (bigg boss marathi) पहिल्या पर्वामुळे विशेष चर्चेत होती.रेशमने बिग बॉस मराठीचं पहिलं पर्व चांगलंच गाजवलं.

आपल्या अभिनयाप्रमाणे सौंदर्यानेही तिने रसिकांची मनं जिंकली आहेत. अभिनय क्षेत्रात यशस्वी ठरलेली रेशम तिच्या खासगी आयुष्यात फिटनेसबाबतही तितकीच सजग आहे. त्यामुळेच की काय फिटनेसच्या बाबतीत आजच्या अनेक अभिनेत्रींना ती कडवी टक्कर देते. तिच्या वयाचा अंदाज बांधणं कुणालाही शक्य नाही.  वयाच्या 48व्या वर्षीही फार फिट आहे रेशम टीपणीस.फिट राहावं आणि सौंदर्य टिकून राहावं यासाठी रेशम बरीच मेहनत घेते.रेशमसुद्धा फिटनेस फ्रिक अभिनेत्रींच्या यादीत गणली जाते. रेशमच्या इन्सटाग्राम अकाउंटवर नजर टाकली असता आपल्याला कळून येईल की रेशम तिच्या फिटनेसबाबत जागरुक आहे आणि त्यामुळेच की काय रेशमचे सौंदर्य आजही अबाधित आहे.

सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. रेशम तिच्या मुलांसोबतचे काही फोटो पोस्ट करत असते. व्हिडीओ फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. तिच्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टी जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता असते. एक बिनधास्त जीवन जगणारी अशी रेशमची ओळख आहे. स्वतःच्या मर्जीनुसार हवं तसं जीवन जगायला तिला आवडतं.

 

सोशल मीडियावर रेशमच्या लेकीचेही फोटो पाहायला मिळतात. रेशमच्या लेकीचे नाव रिशिका असे आहे.रिशिकाचं तिच्या आईशी म्हणजे रेशमशी विशेष नातं आहे. प्रत्यक्ष जीवनात रिशिका कशी आहे हे तुम्हालाही जाणून घ्यायची इच्छा असेल. 

रेशमची लेक रिशिका ही आपल्या आईप्रमाणेच सुंदर आणि तितकीच ग्लॅमरस आहे. रिशिकाचा एक फोटो समोर आला असून त्यात तिचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतो आहे. आईप्रमाणेच रिशिकाही मॉर्डन विचारांची आहे. रिशिका मनमौजी आणि जीवनाचा पूर्ण आनंद घेणारी असल्याचे या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. सोशल नेटवर्किंग साईटवरही रिशिका एक्टिव्ह असते. 

टॅग्स :रेशम टिपणीस