ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि १० : फॅशनिस्टा सोनम कपूर हिने ‘नीरजा’ चित्रपट साकारून तिला एखाद्या व्यक्तीरेखेवर बायोपिकमध्ये काम करता येऊ शकते हे सिद्ध केले आहे. तिचा एक उत्तम अभिनेत्री आणि फॅशन क्वीन म्हणून नामोल्लेख केला जातो. पण कोणी याचा विचार केलाय का की ती यात एवढी परफेक्ट कशी असेल? वेल, तर तिच्या चित्रपट निवडी आणि फॅशन स्टेटमेंटबद्दल तिचा मार्गदर्शक लहान भाऊ हर्षवर्धन हा आहे.
ती सांगते की,‘ एखाद्या चित्रपटाची निवड करणे, स्टाईल स्टेटमेंट करणे, फॅशन ठरवणे याबद्दल मला नेहमीच हर्षवर्धन मार्गदर्शन करत असतो. तसेच आम्ही सर्व भावंडांमध्ये तोच सर्वांत जास्त भावनाशील आहे. त्याच्याकडे पाहिले की मला सकारात्मक ऊर्जा मिळते.’ हर्षवर्धन कपूर हा आता ‘मिर्झ्या’ च्या निमित्ताने बॉलीवूडमध्ये एन्ट्री करतोय. मात्र, सोनम हर्षवर्धन आणि प्रियंका यांना एकत्र आणून त्यांच्यावर चित्रपट साकारण्यासाठी प्रयत्न करत आहे.