नुकताच प्रदर्शित ‘ङोड प्लस’ या चित्रपटातील मुख्य भूमिकेमुळे मोना सिंह खुश आहे. हा राजकीय व्यंगावर आधारित चित्रपट आहे, अशा प्रकारच्या चित्रपटांमध्ये कलाकारांना त्यांच्या भावना व्यक्त करण्याची गरज असते, असे मोनाचे मत आहे. चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्या या चित्रपटात आदिल हुसैन, मुकेश तिवारी आणि संजय मिश्र यांच्याही भूमिका आहेत. मोनाने यापूर्वी ‘3 इडियट्स’ आणि ‘उटपटांग’ मध्येही महत्त्वाच्या भूमिका निभावल्या आहेत. हिंदी सिनेमामध्ये चांगल्या पटकथांची कमतरता असल्याचे तिला वाटते. मोना म्हणते, ‘आपण जे चित्रपट पाहतो, त्यापैकी बरेचसे रोमँटिक असतात. मी रोमँटिक चित्रपटांच्या विरोधात नाही; पण सिनेमा म्हणजे फक्त एवढेच नाही, असे मला वाटते.’