Join us

हॅपी बर्थ-डे सलमान खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2016 15:21 IST

बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा आज वाढदिवस आहे. सल्लूमियाँने 51 व्या वर्षात पदार्पण केले आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 27 - बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा आज वाढदिवस आहे. सल्लूमियाँ आपला 51 वा वाढदिवस जोरात साजरा करत आहे. यानिमित्ताने सलमानचे त्याच्या जवळील नातवाईक, मित्रमैत्रिणींसोबत पनवेल येथील फार्महाऊसवर बर्थ-डे सेलिब्रेशन सुरू आहे. या पार्टीला सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे. सलमानने आपला भाचा आहिलसोबत केक कापला आणि त्याचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. कबीर खान, टीव्ही अभिनेत्री मौनी रॉयसह अनेक प्रसिद्ध कलाकार पार्टीला हजर होते.  सलमानला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी वांद्र्यातील घराबाहेरदेखील गर्दी केली आहे. तर अनेक सेलिब्रिटींना सलमानला ट्विटवरुन शुभेच्छा दिल्या आहेत. 

सलमान खानला वाढदिवसानिमित्त ट्विटशुभेच्छा