Join us

दी हॅपनिंग 2017

By admin | Updated: January 2, 2017 03:11 IST

सिनेसृष्टीची ग्लॅमरस दुनिया़ पैसा, प्रसिद्धी, ग्लॅमर असं सगळं सगळं असलेल्या या दुनियेबद्दलचे सामान्यजनांच्या मनातील आकर्षण, कुतूहल आजही कायम आहे़

सिनेसृष्टीची ग्लॅमरस दुनिया़ पैसा, प्रसिद्धी, ग्लॅमर असं सगळं सगळं असलेल्या या दुनियेबद्दलचे सामान्यजनांच्या मनातील आकर्षण, कुतूहल आजही कायम आहे़ म्हणून केवळ चित्रपटच नव्हे तर या चित्रपटांचा भाग असणाऱ्या सेलिब्रिटींचे खासगी आयुष्य, त्यांची अफेअर-ब्रेकअप्स असे सगळे जाणून घेण्यात आपल्याला रस आहे़ गतवषीर्ही बॉलिवूडबद्दलचे कुतूहल तुमच्या-आमच्या मनात कायम होते़़ या नव्या वर्षातही हे कुतूहल कायम असणार आहे़ पण २०१७मध्ये काही ‘स्पेशल हॅपनिंग’वर तुमच्या-आमच्या सर्वांच्याच नजरा असणार आहेत़ त्या ‘स्पेशल हॅपनिंग’ कुठकुठल्या असू शकतात? याचे उत्तर आमच्या नजरेतूऩ़...तैमूरचा पहिला वाढदिवसकरिना कपूर खान आणि सैफ अली खान यांचा लाडका तैमूर या वर्षात २० डिसेंबरला एक वर्षाचा होणाऱ तैमूरचा पहिला वाढदिवस ही २०१७ची बॉलिवूडमधील ‘मोस्ट अवेटेड हॅपनिंग’ असणार आहे़ नबाब तैमूर अली खान याचा पहिला वाढदिवस कसा सेलिब्रेट होतो, याबद्दलचे कुतूहल मनात घेऊनच बॉलिवूडप्रेमींच्या या वर्षाची सुरुवात होणार आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही़

सेलिब्रिटी किड्सचा बॉलिवूड डेब्यूश्रीदेवीची लाडकी लेक जान्हवी कपूर, किंगखान शाहरूख खानचा मोठा मुलगा आर्यन खान, अमिताभ यांची नात नव्या नवेली चंदा आणि सैफ अली खानची मुलगी (पहिल्या पत्नीपासून झालेली) सारा अली खान या सेलिब्रिटी किड्सच्या बॉलिवूड डेब्यूकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे़ जान्हवी, आर्यन, नव्या, सारा यांचे ग्रँड लॉन्चिंग होणार, हे तर ठरलेले आहे़ पण हे सेलिब्रिटी किड्स कुठल्या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणार? कोण दिग्दर्शक त्यांना लॉन्च करणार? शिवाय हे लॉन्चिंग किती यशस्वी ठरणार? अशा अनेक गोष्टींबद्दल उत्सुकता आहे़ या नव्या वर्षात या प्रश्नांची उत्तरे मिळालीत तर निश्चितपणे बॉलिवूडची ती एक मोठी घडामोड ठरणार आहे़

रणवीर-दीपिका, अनुष्का-विराट येणार का एकत्र?अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तमाम क्रिकेटपटूंच्या गळ्यातील ताईत असलेला विराट कोहली हे लव्हबडर््स लग्नाच्या बेडीत अडकणार का, हे जाणून घेण्याची उत्सुकताही या वर्षात ताणली जाणार आहे़ अनुष्का-विराटप्रमाणेच अभिनेत्री दीपिका पादुकोण व अभिनेता रणवीर कपूर हे बॉलिवूडचे हॉट कपल लग्नबंधनात अडकणार का? याचे उत्तरही या वर्षात मिळणार आहे़ त्याचप्रमाणे अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा बिझनेसमॅन बॉयफ्रेन्ड आनंद अहुजा यांचे नातेही कुठल्या वळणावर जाणार याबद्दलची उत्सुकताही या वर्षात आपण अनुभवणार आहोत़ अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचा कथित बॉयफ्रेन्ड बंटी सजदेव हे दोघे साखरपुडा करणार अशी चर्चा आहे़ करिश्मा कपूर आणि तिचा बॉयफ्रेन्ड संदीप तोष्णीवाल यांच्या अफेअरचीही चर्चा आहे़ एकंदर काय, तर २०१७मध्ये या सर्व लर्व्हबर्ड्सचे रिलेशनशिप स्टेटस बदलत असेल तर ते बॉलिवूडमधील या वर्षातले मोठे हॅपनिंग असणार आहे़

सलमान या वर्षी तरी चढणार का बोहल्यावर?बॉलिवूडचा मोस्ट एलिजेबल बॅचलर सलमान खान लग्न कधी करणार, हा आता जागतिक प्रश्न झाला आहे़ गतवर्षी सलमानचे लग्न होता होता राहिले़ कारण मध्यंतरी सलमान व यूलिया यांच्या लग्नाच्या बऱ्याच वावड्या उठल्या़ यानंतर तेवढ्याच वेगाने त्यांच्या बे्रकअपची बातमीही आली़ पण यानंतरही सलमान व युलिया एकत्र दिसले़ आता पुन्हा त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा आहे़ आता सलमान लग्न करणार का? करणार तर युलियासोबत करणार का? या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यास ती या वर्षातील सर्वांत मोठी बातमी असणार आह़े

बिग ओपनिंगया नव्या वर्षात काही बिग बजेट आणि बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित होत आहेत. बॉक्सआॅफिसवरील या चित्रपटांचे ओपनिंग २०१७मधील मोठी घडामोड असणार आहे़ यात संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावती’ आणि ‘कटप्पाने बाहुबली को क्यों मारा?’ या प्रश्नाचे उत्तर देणारा ‘बाहुबली2’ या दोन बहुप्रतीक्षित चित्रपटांचा समावेश आहे़ याशिवाय सलमान खानचा ‘ट्यूबलाईट’़, शाहरूख खानचा ‘रईस’ बॉक्स आॅफिसवर किती कोटींची कमाई करणार? हे जाणून घेणेही या वर्षात औत्सुक्याचे ठरणार आहे़