Join us  

‘हा’ आहे प्रियांका चोप्राचा दुसरा मराठी चित्रपट

By admin | Published: January 17, 2017 12:12 PM

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पहिला-वहिला मराठी चित्रपट व्हेंटिलेटरने बॉक्सऑफिसवर भरघोस यश मिळवले.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - मनोरंजन विश्वात मराठी चित्रपटांना गेल्या काही दिवसांत अभूतपूर्व महत्त्व आले आहे. मराठी चित्रपटांनी केवळ भारतातीलच नाही तर परदेशातील प्रेक्षकांना याडं लावलं. बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पहिला-वहिला मराठी चित्रपट व्हेंटिलेटरने बॉक्सऑफिसवर भरघोस यश मिळवले. पर्पल पेबल पिक्चर्स अंतर्गत 'काय रे रास्काला' ह्या दुसऱ्या मराठी चित्रपटाची निर्मीती प्रियंका करत आहे. 
 
'क्वांटिको'च्या सेटवर प्रियांका चोप्रा झाली जखमी
 
'काय रे रास्काला' या चित्रपटाच्या मुहूर्तुचा कार्यक्रम दणक्यात पार पाडला. यावेळी प्रियंकाची आई डॉ. मधु चोप्रा, चित्रपटाटे दिगदर्शक गिरीधरन स्वामी, कार्यकारी निर्माती कनिका सदानंद यांच्यासह कलाकार उपस्थित होते.  'काय रे रास्काला' मध्ये मुख्य भुमिकेत अभिनेता गौरव घाटणेकरसह काही नवीन कलाकार आहेत.