‘बोल्ड अॅण्ड सेक्सी’ अभिनेत्री रिचा चड्डा हिने आता ‘खुन आली चिठ्ठी’ या चित्रपटाच्या माध्यमातून निर्मितीक्षेत्रात पाऊल ठेवले आहे. या चित्रपटाची दिग्दर्शिका तिची मैत्रीण रूपिंदर इंदरजीत ही आहे. १९८०-९० दरम्यान पंजाबमध्ये सुरू असलेल्या ‘खलिस्तान चळवळ’ मध्ये झालेल्या दहशतवादी कारवायांविषयी आहे. ही शॉर्ट फिल्म अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये आत्तापर्यंत दाखवण्यात आली आहे. प्रेक्षकांनी या फिल्मचे कौतुक केले. चित्रपटातुन देण्यात येणारा सामाजिक संदेश हे चित्रपटाचे विशेषच म्हणावे लागेल. पंजाबमधील छोट्या गावांपर्यंत हा चित्रपट घेऊन जाण्यासाठी रिचा विशेष प्रयत्न करताना दिसतेय. पंजाबमधील शाळांच्या अभ्यासक्रमाचा भाग हे चित्रपटाचे कथानक आहे. रिचाने हा चित्रपट पंजाबमधील चित्रपटरसिकांसाठी बनवला असल्याने ती प्रचंड खुश आहे.
पंजाबमधील लोकांना रिचा दाखवणार ‘हा’ चित्रपट
By admin | Updated: January 28, 2017 02:09 IST