Join us  

लग्न केलं 'फूल'शी..घरी आली 'पुष्पा'...नवरींच्या अदलाबदलीनं उडला गोंधळ, 'लापता लेडीज'चा मजेशीर ट्रेलर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 7:21 PM

'Lapata Ladies' Movie trailer : 'लापता लेडीज'चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन किरण रावने केले आहे.

दिग्दर्शिका किरण राव(Kiran Rao)च्या कमबॅकची बऱ्याच कालावधीपासून प्रतीक्षा करत होते. आता तिचा 'लापता लेडीज'( 'Lapata Ladies' Movie ) हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. जियो स्टुडिओज आणि आमिर खान प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनलेला लापता लेडीज चित्रपट खूप मजेशीर असणार आहे.

'मिसिंग लेडीज'चा ट्रेलर आता रिलीज झाला आहे. हा ट्रेलर खूपच मनोरंजक आहे. ट्रेलरमध्ये तुम्हाला एक माणूस दिसेल जो लग्नानंतर आपल्या वधूला ट्रेनने गावी घेऊन येतो. दारात वधू जेव्हा चेहरा दाखवण्यासाठी पदर बाजूला घेते तेव्हा वर आणि त्याचे कुटुंब हैराण होतात. प्रत्येकजण पाहतो की त्याच्या सूने ऐवजी कोणीतरी दुसरी स्त्री त्यांच्या समोर उभी आहे. इथूनच सगळा गोंधळ सुरू होतो. तो माणूस इन्स्पेक्टर (रवि किशन) कडे तक्रार नोंदवण्यासाठी जातो. येथून त्याच्या घरी आलेल्या अनोळखी मुलीचा शोध आणि बेपत्ता वधूचा शोध सुरू होतो. चित्रपटाचा ट्रेलर अनेक मजेदार क्षणांनी भरलेला आहे. हा चित्रपट पाहणे प्रेक्षकांसाठी मजेशीर असणार हे ट्रेलरवरून स्पष्ट झाले आहे.

'लापता लेडीज' चित्रपटात प्रतिभा रांटा, स्पर्श श्रीवास्तव आणि नितांशी गोयल या कलाकारांनी काम केले आहे. रवी किशन इन्स्पेक्टरच्या भूमिकेत तर 'पंचायत' फेम दुर्गेश कुमार हवालदाराच्या भूमिकेत दिसणार आहे. 'डेल्ही बेली', 'दंगल' आणि 'पीपली लाइव्ह'च्या निर्मात्यांकडून येणारा, 'लापता लेडीज' रिलीज झाल्यावर विनोदाने भरभरून ट्रीट देईल यात शंका नाही. या चित्रपटाला टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्टँडिंग ओव्हेशन देखील मिळाले आहे.

'लापता लेडीज' या दिवशी होणार प्रदर्शित जिओ स्टुडिओज प्रस्तुत 'लापता लेडीज'चे दिग्दर्शन किरण रावने केले आहे. हा चित्रपट आमिर खान प्रॉडक्शन आणि किंडलिंग प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनवला गेला आहे, ज्याची स्क्रिप्ट बिप्लब गोस्वामी यांच्या कथेवर आधारित आहे. चित्रपटाची पटकथा आणि संवाद स्नेहा देसाई यांनी लिहिले आहेत. दिव्यानिदी शर्मा यांनीही अनेक संवाद लिहिले आहेत. हा चित्रपट १ मार्च २०२४ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :किरण रावरवी किशनआमिर खान