‘खल्लास गर्ल’ या नावाने प्रसिद्ध असलेली ईशा कोप्पीकर आई बनणार असल्याची बातमी आहे. ईशाने २००९ मध्ये टिम्मी नारंगशी लग्न केले होते, त्यानंतर ती चित्रपटांतून गायबच झाली होती. असे असले तरी फिल्मी पार्ट्या आणि कार्यक्रमांमध्ये मात्र तिची झलक दिसत असे. गेल्या काही दिवसांपासून मात्र ईशा या ईव्हेंटस्मधूनही गायब आहे. तेव्हापासूनच ती आई बनणार असल्याच्या बातम्यांनी जोर धरला आहे. अद्याप ईशा किंवा तिच्या पतीने या बातमीला दुजोरा दिलेला नाही; पण तिच्या जवळच्या मित्रांनुसार ईशा गर्भवती असून त्यामुळेच ती पार्ट्यांमध्ये दिसत नसल्याचे कळते.
ईशाकडे गुड न्यूज
By admin | Updated: July 2, 2014 09:03 IST