Join us  

'घाडगे & सून' या मालिकेत अक्षय आणि अमृता अडकणार लग्नबंधनामध्ये !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 4:49 PM

'घाडगे & सून' या मालिकेतील अमृता आणि अक्षय लग्नबंधनामध्ये लवकरच अडकणार आहेत. अक्षयने कियाराला घटस्फोट दिला असून अक्षयने अमृताकडे एक शेवटची संधी मागितली आणि अमृताने ती संधी अक्षयला दिली आहे.

'घाडगे & सून' या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लाडक्या असून ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेत चिन्मय उद्गीरकर अक्षयची तर भाग्यश्री लिमये अमृताची भूमिका साकारत आहेत तर माईच्या भूमिकेत सुकन्या कुलकर्णी आहेत. 

महाराष्ट्राचे तमाम प्रेक्षक ज्या गोष्टीची वाट बघत होते तो क्षण आता आला आहे. अमृता आणि अक्षय लग्नबंधनामध्ये लवकरच अडकणार आहेत. अक्षयने कियाराला घटस्फोट दिला असून अक्षयने अमृताकडे एक शेवटची संधी मागितली आणि अमृताने ती संधी अक्षयला दिली आहे. माईबरोबरच घरातील इतरांनीदेखील अक्षय आणि अमृतच्या लग्नास समंती दिली... आणि आता त्यांचा विवाह सोहळा धूमधडाक्यात पार पडणार आहे.  सगळ्या कठीण प्रसंगांमध्ये अक्षयच्या मागे अमृता खंबीरपणे उभी होती, त्याच्या प्रत्येक निर्णयात अमृताने अक्षयला पाठिंबा दिला, अक्षयला अमृताची मिळालेली ही साथ आता अशीच कायम रहाणार आहे. 

आता खर्‍या अर्थाने अक्षयला अमृताची साता जन्मासाठी साथ मिळाली आहे. अमृता यावेळी कोणताही संकोच मनामध्ये न बाळगता घाडगेंची सून म्हणून माप ओलांडणार आहे. पण, हा विवाहसोहळा निर्विघ्नपणे पार पडेल ? की मनोहर या सुखाच्या क्षणामध्ये मिठाचा खडा टाकेल, हे लवकरच कळेल.. घाडगे सदनमध्ये अमृतासोबतच अनंतची बायको म्हणून घाडगे सदनमध्ये चित्राचा देखील गृहप्रवेश होणार आहे. चित्राची भूमिका सोनल पवार साकारणार आहे.

टॅग्स :घाडगे अँड सून