Join us  

चाहत तेवानी आहे 'या' महिला कुस्तीपटूची फॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 2:47 PM

केसरी नंदन मालिका वडील-मुलगी यांच्या नात्याभवती फिरणारी आहे. तिचे स्वप्न आहे तिचे वडील हनुमंत यांनी कुस्तीपटू व्हावे. मानव गोहिल तिच्या वडिलांची भूमिका साकारणार आहे.

ठळक मुद्दे चाहतने कुस्तीच्या डावपेचांचे प्रशिक्षण घेतलेकुस्तीपटू - गीता फोगटला चाहत आपली आदर्श मानते

केसरी नंदन मालिका वडील-मुलगी यांच्या नात्याभवती फिरणारी आहे. तिचे स्वप्न आहे तिचे वडील हनुमंत यांनी कुस्तीपटू व्हावे. मानव गोहिल तिच्या वडिलांची भूमिका साकारणार आहे. तर केसरीच्या भूमिकेत चाहत तेवानी दिसणार आहे. हनुमंतचे एकमेव स्वप्न आहे त्यांच्या मुलांनी त्याचा कुस्तीचा  वारसा पुढे न्यावा आणि देशासाठी ऑलिम्पिक मध्ये सुवर्णपदक जिंकावे. यात हनुमंतच्या मोठ्या मुलाची जगतची भूमिका आलोक शॉ करणार आहे. या शॉच्या माध्यमातून तो मालिकेमध्ये पदार्पण करतो आहे. 

ही भूमिका साकारण्यासाठी चाहतने कुस्तीच्या डावपेचांचे प्रशिक्षण घेतले. कुस्तीपटू - गीता फोगटला चाहत आपली आदर्श मानते. गीता फोगट ही नावाजलेली खेळाडू असून तिने भारतासाठी कुस्तीतील पहिले सुवर्णपदक जिंकून देशाला गौरव प्राप्त करून दिला आहे. ती अनेक तरुण मुलींची प्रेरणा ठरली आहे. केसरी (चाहत तेवानी) गीताची चाहती तिची आणि तिला भेटण्याची इच्छा केसरीने व्यक्त केली आहे.

केसरी म्हणाली, “मला नेहमीच खेळ खेळायला आवडते. मला पोहणे आणि टेनिस खेळणे अतिशय आवडते, आणि आता मी त्यात कुस्तीचाही अभिमानाने समावेश करू शकेन. माझे पात्र केसरीची देशासाठी ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकण्याची इच्छा आहे. या भूमिकेसाठी गीता फोगट माझी प्रेरणा आहे आणि तिला एक दिवस भेटण्याचे माझे स्वप्न आहे. जर मला तिला भेटण्याची संधी मिळाली तर तिच्या कडून कुस्तीचे काही डावपेच शिकणे मला आवडेल.

टॅग्स :केसरी नंदन