Join us

अखेर अरबाजने मलायकाबद्दल सोडले मौन

By admin | Updated: January 9, 2017 12:00 IST

मागच्यावर्षी बॉलिवूडमध्ये अनेक जोडयांचे ब्रेकअप झाले. त्यात अभिनेता अरबाज खान आणि अभिनेत्री मलायका अरोराच्या ब्रेकअपची सर्वाधिक चर्चा झाली.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 9 - मागच्यावर्षी बॉलिवूडमध्ये अनेक जोडयांचे ब्रेकअप झाले. त्यात अभिनेता अरबाज खान आणि अभिनेत्री मलायका अरोराच्या ब्रेकअपची सर्वाधिक चर्चा झाली. इतकीवर्ष एकत्र संसार केल्यानंतर दोघांमध्ये नेमका ब्रेकअप कशामुळे झाला ? यावर अजूनही उलट-सुलट चर्चा सुरु आहेत. 
 
मलायका आणि अभिनेता अर्जुन कपूरची वाढती जवळीक या ब्रेकअपला कारणीभूत ठरल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. आता स्वत: अरबाज खानने या तुटलेल्या नात्यावर भाष्य केले आहे. डेक्कन क्रॉनिकलला दिलेल्या मुलाखतीत अरबाज म्हणाला कि, आम्ही विभक्त झालोय याचा अर्थ आमच्यात सर्व काही संपलेय असे नाहीय. 
 
आणखी वाचा 
 
मला आणि मलायकाला एक मुलगा आहे. त्यामुळे आम्हाला मैत्रिपूर्ण, चांगले संबंध ठेवणे भाग आहे. विभक्त झाल्यानंतर आम्ही आमच्या आयुष्यात समाधानी आहोत. मी 21 वर्षांपासून मलायकाच्या कुटुंबाला ओळखतो. माझे त्या कुटुंबाशी जवळचे नाते आहे. तुम्ही पाहिलेच असेल. 
 
पालक म्हणून आम्हा दोघांवर अनेक जबाबदा-या आहेत. आमच्यातील संबंध चांगले आणि सामान्य राहिले तरच या जबाबदा-यांना न्याय देता येईल. आम्ही दोघेही परिपक्व असून ही परिस्थिती योग्य प्रकारे हाताळू असे अरबाजने सांगितले.