‘अप्सरा आली’ या गाण्यातून घराघरांत पोहोचलेली तरुणांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपला फॅशन फंडा सांगताना म्हणते की, माझ्या आयुष्यात फॅशनसोबतच्या अनेक गोष्टी मी मूडनुसार करते. मी एक मूडी व्यक्ती आहे. मला कॅज्युअल कपडे फार आवडतात. यामध्ये वनपीस मला जास्त भावतात. त्याची संख्या ही माझ्या वार्डरोबमध्ये जास्त आहे. पार्टीज, इव्हेंट, मुव्ही प्रमोशनवेळी केलेली फॅशन स्टाईल देखील फॅन्स फॉलो करतात, या गोष्टीचा आनंद होतो. ‘मितवा’ या चित्रपटातील लोकप्रिय ‘सावर रे मना’ या गाण्यामध्ये क्रिम कलरचा जो कॉस्च्युम पेहराव केला आहे सेम तीच स्टाइल फॅन्स फॉलो करतात व त्याचे फोटो मला फेसबुक, टिष्ट्वटर या सोशल वेबसाइट्सवर पाठवितात हेच माझ्यासाठी त्यांचे प्रेम आहे.
मूडवर फॅशन डिपेन्ड
By admin | Updated: October 1, 2015 23:19 IST