Join us  

...तर बॉलिवूड सिनेमात आयटम साँग करताना दिसली असती सानिया मिर्झा, फराह खानने दिलेली ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 11:10 AM

फराह खानने सानिया मिर्झाला आयटम साँगची दिलेली ऑफर, पण...

सानिया मिर्झा ही भारताची स्टार टेनिसपटू आहे. तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सानिया तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली होती. खेळाबरोबरच सानियाच्या सौंदर्याचेही चाहते आहेत. सौंदर्याने भुरळ पाडणाऱ्या सानियाला बॉलिवूडमध्ये आयटम साँगची ऑफर मिळाली होती. एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला होता. 

सानिया मिर्झा प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरच्या कॉफी विथ करण ५ शोमध्ये फराह खानसह सहभागी झाली होती.  या मुलाखतीत करण सानियाला म्हणतो की ती एक फिल्मी आहे. जर ती टेनिस खेळाडू नसती तर सानिया कदाचित कॅमेरा मागे किंवा कॅमेरा समोर असती. करणने सानियाचं कौतुक केल्यानंतर फराह खान तिला आयटम साँग ऑफर केल्याचा खुलासा करते. "सानिया फिल्मी चेहरा आहे. मी तिला अनेक आयटम साँगची ऑफरही दिली होती", असं फराह म्हणते. 

त्यानंतर करण विचारतो की सानियाने ऑफर स्वीकारली होती की नकार दिला होता? तेव्हा फराह खान उत्तर देत म्हणते की सानियाने सगळ्या ऑफर नाकारल्या. साजिद खाननेही सानियाला त्याच्या एका सिनेमात आयटम साँगची ऑफर दिल्याचा खुलासा फराहने केला. पण, सानियाला सिनेमात अभिनेत्री किंवा सिंगर म्हणून दिसण्याच कोणताच इंटरेस्ट नसल्याचंही फराहने सांगितलं होतं. 

सानिया तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली होती. सानियाने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकशी २०१० मध्ये निकाह केला होता. लग्नानंतर १४ वर्षांनी ते आता एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. सानिया आणि शोएबला एक मुलगाही आहे. शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी निकाह करत तिसऱ्यांदा संसार थाटला आहे. 

टॅग्स :फराह खानसानिया मिर्झा