Join us  

VIDEO : सैफच्या लेकाला पाहून ‘आर्यन..आर्यन...’ म्हणून ओरडू लागले लोक..; पाहा, इब्राहिमची रिअ‍ॅक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 5:11 PM

Saif Ali Khan Son Ibrahim Ali Khan New Video: होय, सैफचा लेक मित्रांसोबत दिसला आणि त्याला पाहताच फॅन्स ‘आर्यन... आर्यन... म्हणून ओरडू लागले...

Saif Ali Khan Son Ibrahim Ali Khan New Video: सैफ अली खान (Saif Ali Khan ) आणि अमृता सिंह यांचा लाडका लेक इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) एक लोकप्रिय स्टारकिड आहे. पब्लिकमध्ये दिसला रे दिसला की पापाराझींचे कॅमेरे त्याला घेरतात. तूर्तात सैफच्या लेकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. होय, सैफचा लेक मित्रांसोबत दिसला आणि त्याला पाहताच फॅन्स‘आर्यन... आर्यन...(शाहरूख खानचा लेक आर्यन खान)’   (Aryan Khan) म्हणून ओरडू लागले. होय, लोक इब्राहिमला  आर्यन समजून बसले आणि त्याच नावानं हाक मारू लागले. इब्राहिमला क्षणभर काही कळेना. मग मात्र त्यालाही हसू आवरेना...

 सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने इब्राहिमचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये इब्राहिम गाडीमध्ये बसताना दिसत आहे. याचदरम्यान फॅन्स  त्याला आर्यन... आर्यन... म्हणून हाक मारतात. ते ऐकून इब्राहिमच्या मित्रांना हसू अनावर होतं. इब्राहिम देखील फोटोग्राफरकडे पाहून हसायला लागतो आणि गाडीत जाऊन बसतो. सध्या इब्राहिमचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.

इब्राहिम अली खान हा अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंगचा मुलगा आहे. इब्राहिम अली खानने मुंबईतील धीरूभाई अंबानी आंतरराष्ट्रीय शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केलं.   पुढील शिक्षणासाठी तो इंग्लंडमध्ये गेला होता. लवकरच इब्राहिम बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार अशी चर्चा आहे. मध्यंतरी करण जोहर इब्राहिमला लॉन्च करणार अशी चर्चा रंगली होती.

खरं तर इब्राहिमला त्याचे आजोबा मंसूर अली खान पतौडी यांच्यासारखी क्रिकेटची आवड आहे. या खेळात इब्राहिम तरबेज असल्याचं म्हटलं जातं. मात्र क्रिकेट आणि अ‍ॅक्टिंग यापैकी एका क्षेत्राची निवड करायची वेळ आली, तेव्हा त्याने अ‍ॅक्टिंग क्षेत्राची करिअरसाठी निवड केली. आता तो कोणत्या चित्रपटातून पदार्पण करतो, हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे.

टॅग्स :इब्राहिम अली खानसैफ अली खान