गाजलेला मराठी चित्रपट ‘फॅन्ड्री’ आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाला असून गुगल प्ले, आय-टय़ुन्स आणि फेसबूकवर त्याला रिलिज करण्यात आले आहे. मराठीत अशा प्रकारे प्रदर्शित होणारा तो पहिलाच चित्रपट ठरला आहे. यामुळे तो आता जवळपास 11क् देशांमधून पाहता येणार आहे. ‘सिने कारवान’ ही नावाजलेली कंपनी या चित्रपटाच्या डिजिटल आवृत्तीचे प्रदर्शन करत आहे. अमॅझॉन, फेसबूक, बी स्काय बी, नेटफिक्स यासह अनेक सोशल व ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट आहे.