Join us  

तर तू माझ्या घरात पाऊलही ठेवू नकोस, दुलकर सलमानला वडिलांनी दिली होती तंबी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 12:02 PM

अभिनेत्याने स्वत: हा खुलासा एका मुलाखतीदरम्यान केला होता.

दुलकर सलमान केवळ दक्षिणेतच नाही तर बॉलिवूडमध्येही लोकप्रिय आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत या अभिनेत्याचा मोठा चाहता वर्ग आहे. दक्षिण सिनेमातील त्याच्या रोमँटिक भूमिकांसाठी ओळखल्या जाणार्‍या, दुल्कर सलमानचा आज वाढदिवस आहे. दुलकर सलमानने २०१५ मध्ये त्याचा तमिळ चित्रपट 'ओके कानमानी'च्या माध्यमातून दक्षिणेतील  प्रेक्षकांची मनं जिंकली होती. सलमान आपल्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करत असला तरी अभिनेत्याने त्याचे वडील मामूट्टी यांनी नेहमीच त्याच्या चित्रपटांच्या निवडीवर आक्षेप घेतला असल्याचे म्हटले आहे.

एका मुलाखती दरम्यान सलमान म्हणाला होता की, त्याच्या चित्रपटांच्या निवडीबद्दल त्याच्या वडिलांना खूप आक्षेप असेल. अभिनेता म्हणाला, 'ते स्वत: वर्षाला पाच चित्रपट करतात आणि मी सहसा असे आठ-नऊ महिन्यांचे प्रोजेक्ट करतो जे त्यांना कळत नाहीत. ते मला म्हणतात, की जर तू वर्षभरात एकही चित्रपट केला नाही तर तू माझ्या घरी येऊ नकोस. 

दुलकर सलमान आणि पत्नी अमल सुफिया यांची लव्हस्टोरी फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. एका मुलाखतीत अभिनेत्याने  लव्हस्टोरी सांगितली होती. दुलकर अमेरिकेवरून शिक्षण पूर्ण करून परतला होता आणि त्याच्यावर लग्न करण्याचा दबाव वाढत होता. त्याच्या कुटुंबाने व मित्रांनी एका मुलीचं स्थळ सुचवलं. ती दुलकरची स्कूल मेट होती. ती सुद्धा त्याला पाच वर्षे ज्युनिअर. पण तोपर्यंत तरी दुलकरला त्या मुलीत फारसा काही इंटरेस्ट नव्हता. पण याचदरम्यान असं काही घडलं की, दुलकरने त्या मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला कारण ठरला एक सुंदर योगायोग.घरच्यांनी सुचवलेली मुलगी या ना त्या निमित्ताने सतत दुलकर समोर येऊ लागली. तो फिरायला गेली, तिथे ती होती. तो सिनेमा पाहायला गेला आणि तिथेही ती होती. सेम मुलगी, सेम टाईम, सेम शो पाहायला पोहोचलेली पाहून दुलकर हैराण होता.

हा योगायोग नक्कीच नसावा. काहीतरी विधीलिखीत असावं, असं दुलकरला वाटलं आणि त्या मुलीशी लग्न करण्यास काहीही हरकत नाही, असं त्याला वाटलं. ती मुलगी अर्थातच अमाल होती. एकदिवस त्याने हिंमत केली आणि अमालला कॉफी डेटसाठी विचारलं. मग घरच्यांना सांगितलं. दोघांच्याही कुटुंबाने अर्थातच लग्नाला होकार दिला. त्यामुळे हे लव्ह कम अरेंज असल्याचं दुलकर नेहमी सांगतो.

टॅग्स :दुलकर सलमान