2019 हे वर्ष आयुषमान खुराणासाठी लकी ठरले. 'ड्रीम गर्ल', 'आर्टिकल 15' आणि 'बाला' हे सिनमा सुपरहिट ठरत बॉक्स ऑफिसरवरही गलेलठ्ठ कमाई केली. तर दुसरीकेड 'अंधाधुन' या सिनेमासाठी तर आयुषमानला सर्वोक्तृष्ठ अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. त्यामुळे या वर्षात फक्त आणि फक्त आयुषमानचा बोलबाला पाहायला मिळाला. या वर्षात तो सगळ्यात जास्त बिझी होता.
सतत तो फक्त कामात व्यस्त होता. त्याला त्याच्या कुटुंबालाही वेळ द्यायला पुरेसा वेळ मिळत नव्हता. अखेर आता सगळ्या कमिटमेंटस पूर्ण केल्यानंतर आयुष्मान कुटुंबासह व्हॅकेशन एन्जॉय करतोय. यावर्षी मुलांचे उन्हाळ्याच्या सुट्ट्याही अशाच गेल्या. त्यांना कुठेच घेऊन जाता आले नाही. म्हणून आता मिळालेल्या वेळेत फक्त आणि फक्त पत्नी आणि मुलं यांच्याबरोबर क्वॉलिटी टाईम एन्जॉय करायचे त्याने ठरवले आहे.
इतकेच नाही तर आता येणारे तीन ते चार महिने तो कामातूनही ब्रेक घेणार आहे.या ब्रेकमध्ये तो फक्त मुलांना वेळ देणार आहे. गाडी चांगली रूळावर असताना आयुषमानचे इतका कालावधी कामापासून दूर राहणे हे त्याच्या फायद्याचे ठरणार का? या प्रश्नावर त्याने म्हटले की, आगामी काळात प्रदर्शित होणारे 'गुलाबो सिताबो' आणि 'शुभ मंगल' दोन्ही सिनेमांचे काम संपले आहे. त्यामुळे निवांत मी आता ब्रेक घेऊ शकतो.
त्याच्या संपूर्ण करिअरमध्ये पहिल्यांदा त्याने इतका मोठा ब्रेक घेतला असावा. याच वेळेत तो उर्दूही लिहीणे आणि वाचणे शिकणार आहे. आगामी काळात त्याला कविता संग्रह बनवायचा आहे. त्यामुळेच ही भाषा चांगल्याप्रकारे अवगत होणे गरजेचे आहे. म्हणून तो उर्दू भाषेचे धडे गिरवणार आहे.