Join us  

डबलरोल साकारणा-या नट्या

By admin | Published: May 28, 2015 12:00 AM

ज्येष्ठ अभिनेत्री नीतु सिंगने "दो कलियाँ" या चित्रपटात दुहेरी भूमिका साकारली होती. परंतू ही व्यक्तीरेखा बालकलाकारची असल्याचने त्याची पुढे ...

ज्येष्ठ अभिनेत्री नीतु सिंगने "दो कलियाँ" या चित्रपटात दुहेरी भूमिका साकारली होती. परंतू ही व्यक्तीरेखा बालकलाकारची असल्याचने त्याची पुढे फारशी चर्चा झाली नाही.

१९७२ साली आलेल्या "सीता और गीता" या चित्रपटात अभिनेत्री हेमा मालिनीने साकारलेली दुहेरी भूमिका अनेकांच्या पसंतीस उतरली होती. एखाद्या अभिनेत्रीने चित्रपटात दुहेरी भूमिका (डबलरोल ) साकारण्याचा हा पहिला प्रयोग दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी केला व त्याला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला.

८०च्या दशकातील सुपरडुपर हिट ठरलेल्या "चालबाज" चित्रपटाचं नाव येताच डोळयासमोर उभी राहते ती श्रीदेवीनं साकारलेली अंजु आणि मंजुची दुहेरी भूमिका. एक खट्याळ तर दुसरी संस्कारीक अशी दुहेरी भूमिका या चित्रपटात श्रीदेवीने साकारली होती.

"रॉय" चित्रपटात रणबीर कपुर आणि अर्जून रामपाल ही जोडी असताना हा चित्रपट २०१५ साली कधी येवून गेला हे अनेकांना कळले नाही तसेच या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिसने डबलरोल साकारला होता याची सुध्दा फारशी चर्चा झाली नाही.

अभिनेत्री बिपाशा बासू सुध्दा सुपरहिट ठरलेल्या धूम-२ चित्रपटात डबलरोलमध्ये दिसली. मोनाली बोस आणि शोनाली बोस अशी दुहेरी व्यक्तीरेखा बिपाशाने या चित्रपटात साकारली.

सध्याची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोन हिने बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानच्या "ओम शांती ओम" चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. संध्या आणि शांती प्रिया अशी दुहेरी भूमिका दीपिकाने साकारली. तसेच "चांदनी चौक टू चायना" या चित्रपटातही दीपिकाने डबलरोल केला आहे.

"दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे" कुछ कुछ होता है यासारख्या सुपरहिट चित्रपटातसोबतच आपल्या अभिनयाच्या जोरावर अभिनेत्री काजोल हिने अनेक हिट चित्रपट दिले. परंतू "कुछ खट्टी कुछ मिठ्ठी" या चित्रपटातून दुहेरी भुमिका साकारलेली काजोल अनेकांना पसंत पडली नाही. या चित्रपटाची फारशी चर्चा सुध्दा झाली नाही.

बॉलिवूडची क्वीन अशी ओळख असलेल्या कंगणा राणावतने "तनु वेड्स मनु रिटर्न्स" चित्रपटात साकारलेल्या डबलरोलची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. चित्रपटांतील दोन्ही पात्र साकारताना कंगणाने आपल्या कसदार अभिनयाने दोन्ही पात्रांना उत्तम न्याय दिला असून बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट चांगली कमाई करत आहे. कंगणासोबतच आणखी कोण-कोणत्या चित्रपटात नट्यांनी दुहेरी भूमिका (डबरलरोल ) साकारली आहे यानिमित्ताने.....