ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 26 - ‘डॉन ३’ ची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शाहरूख खानच्या तमाम चाहत्यांसाठी एक आनांदाची बातमी आहे. निर्माता रितेश सिधवानीने आपल्या इस्टांग्रामवर डॉन 3 सुरू करणार असल्याचे संकेत दिले आहेत. एक्सेल एंटरटेनमेंट प्राइवेट लिमिटेड या त्यांच्या कंपनीला आज 15 वर्ष पुर्ण झाली म्हणून त्यांनी एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या 15 वर्षाच्या चित्रपट निर्मितीत सर्वात हटके चित्रपट हा डॉन असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्या पोस्टबरोबर सिधवानींने शाहरूखचा फोटो शेअर करत डॉन 3 ची घोषणा केली आहे.
रितेश सिधवानीच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर तर्कवितर्क काढण्यात येऊ लागले आहेत. त्यामुळे चर्चेला उधान आले आहे. या चित्रपटात शाहरूख खानसोबत कोणती अभिनेत्री असेल हे अद्याप स्पष्ट झाले नाही. जंगली बिल्ली प्रियंका चोप्रा सध्या हॉलिवूडमध्ये बिझी आहे. कदाचीत डॉनच्या 3 भागामधून ती बॉलिवूडमध्ये पुनराग्मन करू शकते. डॉनच्या दोन्ही भागात प्रियंका चोप्राने भुमिका केली होती. तर पहिल्या भागात करिना कपूर आणि दुसऱ्या भागात लारा दत्ताने आपली भुमिका चोख बजावली होती. बोमन इरानीनेही दोन्ही भागात खलनाक उत्कृष्ट वटवला होता.
दरम्यान, ‘डॉन ३’ची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे, पण अलीकडे या तिसऱ्या भागात मुख्य नायिका कोण असणार, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. डॉन सीरिजची महत्त्वाची भाग राहिलेली ही ‘जंगली बिल्ली’ शाहरूखला आता नकोय, असेदेखील बोलले जातेय. तिच्या जागी जॅकलीन किंव्हा कतरीना कैफला कास्ट करण्याचीही बातमी आली आहे.