कुत्र्यासोबत कॅमेरा शेअर करणो अक्षयकुमारला जास्तच आवडलं आहे. ‘हॉलीडे’ या नुकत्याच रिलीज झालेल्या चित्रपटातही अक्षयचे श्वानप्रेम दिसून आले. ‘इटस् एंटरटेन्मेंट’ हा अक्षयचा चित्रपट येत्या ऑगस्टमध्ये रिलीज होत आहे. या चित्रपटाच्या प्रोमोजमध्येही अक्षय एका श्वानासोबत दिसून आला. प्रोमोजमध्ये दिसणा:या कुत्र्याभोवतीच या चित्रपटाची कथा फिरते. ‘एंटरटेन्मेंट’ असे या कुत्र्याचे नाव असून, बहुतांश दृश्यात तो अक्षयसोबत दिसणार आहे. चित्रपटातील ‘जॉनी जॉनी’ हे गाणो चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच लोकप्रिय ठरले आहे. या गाण्यात अक्षय आणि तमन्ना भाटिया हॉट लूकमध्ये दिसत आहेत.
अक्षयचे श्वानप्रेम
By admin | Updated: June 29, 2014 23:53 IST