Join us

‘टाइमपास’ म्हणून चित्रपट पाहू नका!

By admin | Updated: January 26, 2015 04:23 IST

चित्रपट किंवा अन्य कोणत्याही कलेचा आस्वाद घेताना केवळ ‘टाइमपास’ हा दृष्टिकोन ठेवू नका. नाटक, चित्रपट किंवा चित्रकला यांचा इतिहास,

कोल्हापूर : चित्रपट किंवा अन्य कोणत्याही कलेचा आस्वाद घेताना केवळ ‘टाइमपास’ हा दृष्टिकोन ठेवू नका. नाटक, चित्रपट किंवा चित्रकला यांचा इतिहास, निर्मितीसाठी कलाकारांनी वापरलेली साधने आणि त्यांचा वापर यांचा अभ्यास या कलांकडे पाहण्याची दृष्टी आणि जाणीव प्रगल्भ करण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी रविवारी केले.‘चिल्लर पार्टी’ या विद्यार्थी चित्रपट चळवळीतर्फे शाहू स्मारक येथे झालेल्या या मुक्त संवादात अमोल पालेकर बोलत होते. ज्येष्ठ कार्यकर्ते गोविंद पानसरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. अमोल पालेकर यांनी चित्रपट निर्मितीचे विविध पैलू विद्यार्थ्यांसमोर मांडले. चित्रपटातील नायक-नायिकांची नावे मुलांना-पालकांना तोंडपाठ असतात; पण दिग्दर्शक, कॅमेरामन व अन्य तंत्रज्ञांची नावे माहीत नसतात. केवळ अमुक एक अभिनेता किंवा अभिनेत्री आहे म्हणून चित्रपट पाहण्याकडे लोकांचा कल असतो. क्रेडिट टायटल्स पाहण्याअगोदरच लोक बाहेर पडतात. पालकांची ही सवय मुलांनाही लागते. चित्रपटाचे कथा-पटकथा लेखक तसेच चित्रपट निर्मितीती सहभागी तंत्रज्ञ, कॅमेरामन यांचीही भूमिका महत्त्वाची असते, याकडे दुर्लक्षच होते, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)