फिल्मी जगतातील सर्वच अभिनेत्री त्यांच्या फिटनेसबाबत जास्तच जागरूक असतात. त्यामुळे हेवी वर्कआऊटशिवाय डायटवरही त्यांचे विशेष लक्ष असते. डाएट म्हटले तर मिठाई वजर्च; पण बॉलीवूडची बिनधास्त अभिनेत्री बिपाशा बासू इतरांपेक्षा काहीशी वेगळी आहे. फिटनेससाठी ती जीममध्ये खूप घाम गाळते; पण मिठाई पाहिली, तर तिचे स्वत:वर नियंत्रण राहत नाही. मिठाईबाबतचे प्रेम बिपाशाने ट्विटरवर जाहीर केले आहे. तिने ट्विट केले की, बंगाली असल्याने मिठाईला नाही म्हणणो अवघड आहे, युद्ध सुरू आहे. पाहूयात मी किती दिवस गोड पदार्थापासून लांब राहते ते.’ बिपाशा नुकतीच चर्चेत राहिली ते हरमन बावेजाशी झालेल्या ब्रेकअपमुळे.