Join us  

दिग्दर्शक आश्विनी अय्यर करणार आता ‘हे’ काम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2020 5:45 PM

कंगनाच्या आयुष्यात अजूनही खूप काही घडायचे बाकी आहे. ‘पंगा’ हिट ठरल्यानंतर मुंबईमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये तिने हे सांगितले.

‘पंगा’ चित्रपटाची दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारीचे म्हणणे आहे की, मला संधी मिळाली तर मी कंगना रनोटचा बायोपिक बनवण्यास तयार आहे. त्याचे ‘कंगना व्हर्सेस कंगना’ हे शीर्षक ठेवायला मला आवडेल. तथापि, तिने हेदेखील सांगितले की, हा निर्णय थोडा घाईचा ठरेल. कारण कंगनाच्या आयुष्यात अजूनही खूप काही घडायचे बाकी आहे. ‘पंगा’ हिट ठरल्यानंतर मुंबईमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये तिने हे सांगितले.

अश्विनी म्हणाली, ‘जर कंगनाने परवानगी दिली तर तिचा बायोपिक बनवण्यामध्ये मला कोणतीच अडचण नाही. मात्र, तिच्या आयुष्याच्या प्रवासामध्ये अजून खूप काही बाकी आहे. आधी तिने लग्न करावे. त्यानंतरच मी तिच्यावर बायोपिक बनवण्याबाबत विचार करेन. विशेष म्हणजे ‘थलाइवी’मध्ये अभिनय केल्यानंतर कंगनाने स्वत: आपला बायोपिक बनवण्याची कल्पना मला सांगितली. ती खूप उत्साहित आहे. आपल्या बायोपिकचे दिग्दर्शनही स्वत:च करण्याची तिची इच्छा आहे. तरी देखील मला तिचा बायोपिक बनवण्याची संधी मिळाली तर मी नक्कीच त्याची निर्मिती करेन. कदाचित त्याचे शीर्षक ‘कंगना व्हर्सेस कंगना’ असे असेल. ती खूपच स्पष्टवक्ती आहे.

कार्यक्रमादरम्यान अश्विनी म्हणाली, ‘मी एक अभिनेत्री म्हणून कंगना रनोटचा खूप आदर करते. मला वाटते की, तिच्यामध्ये माणुसकीदेखील आहे. तथापि, ती आपल्यातील माणुसकी कुणालाही दाखवू इच्छित नाही. कारण जर कुणी वारंवार फोन किंवा ट्विटरवर तुमच्याकडून केलेल्या वक्तव्यावर टीका करत असेल तर अशा वेळी तुम्हाला राग येणार नाही का? एखाद्या कॉल सेंटरप्रमाणे वारंवार कुणी फोन करून त्रास देत असेल तर त्यावेळी तुम्ही काय कराल? अशा वेळी तुम्ही तुमचा फोन बंद कराल किंवा ओरडाल. हाच संपूर्ण मुद्दा आहे, असे मला वाटते.’

अश्विनीच्या मते, ‘मणिकर्णिका’ चित्रपटादरम्यान कंगनासमोर अनंत अडचणी येत होत्या. त्या वेळी मी तिच्यासोबत ‘पंगा’ची शूटिंग करत होते. ती काय विचार करत होती किंवा त्या वेळी कोणत्या संकटांचा सामना करत होती, हे कुणालाही माहीत नव्हते. तिच्यासोबत माझे वेगळे संबंध आहेत. आमचे नाते विश्वासावर आधारित आहे. एका बाबतीत आम्ही दोघीही समान आहोत. जग आमच्या बाबतीत काय विचार करत आहे, याची आम्ही कधीच परवा करत नाही.’

टॅग्स :अश्विनी अय्यर तिवारीकंगना राणौत