Join us  

दिग्पाल लांजेकरच्या ‘सुभेदार’ची बॉक्स ऑफिसवरील गाडी सुसाट, अवघ्या तीन दिवसांत कमावले कोट्यवधी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 12:32 PM

एकीकडे बॉक्स ऑफिसवर ‘गदर 2’ आणि ‘ड्रीम गर्ल 2’ यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांची चर्चा असतानाच ‘सुभेदार' प्रेक्षकांची गर्दी आपल्याकडे खेचण्यात यशस्वी झाला आहे.

‘फर्जंद, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ या चित्रपटांनंतर दिग्पाल लांजेकरांच्या ‘सुभेदार’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखरे २५ ऑगस्टला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. नरवीर तान्हाजी मालुसरेंच्या शौर्याची असीम गाथा आणि सिंहगडाच्या लढाईचा थरार या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर मांडण्यात आला आहे. टीझरपासूनच या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत होती. या चित्रपटातील गाणीही प्रचंड हिट झाली होती. प्रदर्शनाआधीच या चित्रपटाच्या सात हजारांहून अधिक तिकिटांची विक्री झाली होती. आता या सिनेमांची पहिल्या दोन दिवसांची कमाईचा आकडा समोर आला आहे. 

एकीकडे बॉक्स ऑफिसवर ‘गदर 2’ आणि ‘ड्रीम गर्ल 2’ यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांची चर्चा असतानाच ‘सुभेदार’ने प्रेक्षकांची गर्दी आपल्याकडे खेचली आहे. या चित्रपटातून नरवीर तान्हाजी मालुसरेंच्या शौर्याची असीम गाथा आणि सिंहगडाच्या लढाईचा थरार रुपेरी पडद्यावर मांडण्यात आला आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता अजय पूरकर यांनी तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारली आहे. 

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या सिनेमाने पहिल्यादिवशी 1.05 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. तर दुसऱ्या दिवशी शनिवारी ‘सुभेदार’ने शनिवारी 1.75 कोटी रुपये कमावले.  तिसऱ्या दिवशी चित्रपटाने ०२.२२ कोटी रुपये कमवत तीन दिवसांत एकूण ५.०६ कोटींची कमाई केली आहे.

तान्हाजी मालुसरेंआधी अजय पूरकर ‘पावनखिंड’ चित्रपटात बाजीप्रभू देशपांडेंच्या भूमिकेत दिसले होते. त्यांनी साकारलेली बाजीप्रभूंची भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आता ‘सुभेदार’ चित्रपटातून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केलं आहे. अजय पूरकर यांच्याबरोबर या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, शिवानी रांगोळे, स्मिता शेवाळे, विराजस कुलकर्णी, समीर धर्माधिकारी अशी कलाकारांची तगडी फौज आहे.

 

टॅग्स :दिग्पाल लांजेकरचिन्मय मांडलेकर