Join us

पिळदार मिशीने मिळवून दिली एक वेगळी ओळख

By admin | Updated: January 7, 2017 02:31 IST

अभिनयाच्या क्षेत्रात स्टाइलला पूवीर्पासूनच खूप महत्त्व आहे

अभिनयाच्या क्षेत्रात स्टाइलला पूवीर्पासूनच खूप महत्त्व आहे. त्यामुळे या क्षेत्रानेच मला स्टाइल शिकवली, असं सुशांत सिंग म्हणाला आहे. स्टाइलही आपली पर्सनॉलिटी आणि एटीड्युडशी जुळलेली असते. तुम्ही जसे आहात तोच एटीड्युड तुमच्या स्टाइलमधून दिसायला हवा. माझ्यासाठी गुलजार साहेब स्टाइल आयकॉन आहेत. त्यांची ड्रेसिंग स्टाइल इतरांवर लगेच प्रभाव पडतो. अब्बास मस्तान यांची स्टाइल खूप सेन्सिबल आहे. माझ्याविषयी बोलायचे झाले तर जीन्स आणि शर्टसमध्ये मी जास्त कम्फ र्टेबल असतो. माझ्याकडे 10 वर्षाआधीचे जुने कपडेही आहेत. ते अतिशय चांगल्यापध्दतीने मी सांभाळून ठेवले आहेत. मी एक सिनेमा केला त्यात थोडी मिशी ठेवली होती. सिनेमाचे शूटिंग झाले नंतर काही काम नव्हते. ृएकदा जीममध्ये वर्कआऊट करत असताना माझ्या शेजारी उभ्या असणा-या एका माणसाने मला मिशी वाढवायचा सल्ला दिला. तसेच त्यांने मला मिशीला पिळ देण्यास सांगितले. त्याचे बोलणे ऐकून मला थोडी गंमत वाटली आणि त्याचा सल्ला ऐकण्याचा मी निर्णय घेतला. विशेष म्हणजे मिशी वाढवल्यानंतर मला सावधान इंडिया शोच्या अँकरिंगची संधी मिळाली. मिशीमुळे मला कडक, तडफदार पोलीस, राजकारणी असे रोल्स आॅफर होतात आणि आता मला मिशीशिवाय राहणे शक्यच नाही. त्याची एक सवयच झालीय. त्यामुळे मिशीशिवाय मला स्वत:लाही राहायला आवडणार नाही. सो येस मिशीने मिळवून दिली मला एक वेगळी दंबग स्टाइल.