Join us  

Victoria Marathi Movie : 'पठाण'चा वाद विसरुन शाहरुखने केलं मराठी चित्रपटाचं प्रमोशन ? विराजस कुलकर्णीने शेअर केला व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2023 1:51 PM

बॉलिवुडचा किंग शाहरुख खान (Shahrukh Khan) तिकडे पठाणच्या वादात आणि प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. असं असतानाही थेट शाहरुखनेच व्हिक्टोरिया सिनेमाचे प्रमोशन केल्याचा व्हिडिओ विराजसने शेअर केला आहे.

Victoria Marathi Movie : अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog), आशय कुलकर्णी (Aashay Kulkarni) आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) यांची प्रमुख भूमिका असलेला 'व्हिक्टोरिया' हा मराठी हॉरर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सिनेमाच्या ट्रेलरने तर थरकाप उडवला आहे. मराठीत पहिल्यांदाच असा काही प्रयोग झाला आहे. विराजस कुलकर्णीने (Virajas Kulkarni) याद्वारे दिग्दर्शनात नशीब आजमावत आहे. सध्या पुष्कर, विराजस आणि सोनाली तिघेही सिनेमाचे दणक्यात प्रमोशन करत आहेत. तर बॉलिवुडचा किंग शाहरुख खान (Shahrukh Khan) तिकडे पठाणच्या वादात आणि प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. असं असतानाही थेट शाहरुखनेच व्हिक्टोरिया सिनेमाचे प्रमोशन केल्याचा व्हिडिओ विराजसने शेअर केला आहे.

'व्हिक्टोरिया' सिनेमाचा दिग्दर्शक विराज कुलकर्णीने शाहरुख खानचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये शाहरुख एका ऑफिस केबिनमध्ये असून बॅकग्राऊंडला हॉरर म्युझिक लावले आहे. लोक कसे अंधविश्वासू असतात, भूत प्रेत यावर विश्वास ठेवतात असं तो या व्हिडिओमध्ये म्हणतोय.हाच व्हिडिओ विराजसने पोस्ट करत लिहिलं, शाहरुख खानने व्हिक्टोरियाचं प्रमोशन केलं? अजिबात नाही, पण तुम्हाला १३ जानेवारीला येऊन चित्रपट बघायला काहीच हरकत नाही! एक असं थरारक अनुभव जो मराठी चित्रपटात कधीच अनुभवला नसेल!

आजकाल प्रमोशनचे भन्नाट फंडे वापरले जात आहेत. विराजसनेही असेच भन्नाट प्रमोशन करत थेट शाहरुखचाच व्हिडिओ पोस्ट केला आहे. 

Pushkar Jog : 'मराठी चित्रपटांची गळचेपी, भीक मागून...'मराठी सिनेमांच्या अवस्थेवर पुष्कर जोग स्पष्टच बोलला

व्हिक्टोरिया सिनेमाचा ट्रेलर पाहूनच खरं तर उत्सुकता वाढली आहे. सिनेमाचे संपूर्ण शूटिंग लंडनमध्ये झालं आहे.लंडनमधल्या एका आलिशान हॉटेलमध्ये हे शूट असून तिथे हॉटेलमधलं निगेटिव्ह वातावरण आणि त्यात राहायला आलेले आशय आणि कुलकर्णी यांना कसे अनुभव येतात या भोवती हा सिनेमा फिरतो. अगदी पहिल्या फ्रेम पासून चित्रपट खिळवून ठेवणारा आहे. १३ जानेवारी रोजी सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यास सज्ज आहे.

टॅग्स :विराजस कुलकर्णीशाहरुख खानसोनाली कुलकर्णीपुष्कर जोगमराठी अभिनेता