Join us

सुशांत बनणार धोणी

By admin | Updated: December 27, 2014 01:51 IST

बॉलीवूडचा उगवता तारा सुशांत सिंग राजपूत त्याच्या कामामुळे चर्चेत आहे. ‘पीके’मध्ये छोटी पण महत्त्वाची भूमिका साकारणारा सुशांत आता भारतीय कर्णधाराच्या रूपात दिसणार

बॉलीवूडचा उगवता तारा सुशांत सिंग राजपूत त्याच्या कामामुळे चर्चेत आहे. ‘पीके’मध्ये छोटी पण महत्त्वाची भूमिका साकारणारा सुशांत आता भारतीय कर्णधाराच्या रूपात दिसणार आहे. भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर आधारित चित्रपटात तो धोनीची भूमिका साकारणार आहे. त्याचा हा फर्स्ट लूक सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. ‘अ वेनस्डे’ आणि स्पेशल २६ चित्रपटांचे दिग्दर्शक निरज पांडे यांनी धोनीवरील या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता रामचरण हा सुरेश रैनाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे.