Join us  

सारा अली खानची इन्स्ट्राग्रामवर धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2016 6:06 PM

लिवूडमधील हॉट कपल सैफ अली खान आणि करिना कपूर नेहमीच चर्चेत असतात.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 16 - बॉलिवूडमधील हॉट कपल सैफ अली खान आणि करिना कपूर नेहमीच चर्चेत असतात. मात्र सध्या चर्चा आहे ती सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी सारा अली खान हिची. सारा अली खान आता मोठी झाली आहे. ती परदेशातून अभ्यास संपवून लवकरच भारतात येणार असल्याची माहिती फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता यांनी दिली आहे. ती सध्या मीडियाच्या चर्चेच्या केंद्रस्थानी असते. ती खूपच सुंदर दिसत असून, जिथं जाते तिकडे सगळ्यांचं लक्ष्य वेधून घेत आहे. मसाबा गुप्तांनी इन्स्ट्राग्रामवर साराचा फोटो शेअर केला आहे. त्या फोटोला मोठ्या प्रमाणात हिट्स मिळत आहेत. 
"साराचा फोटो बघून मी फारच आश्चर्यचकित झाली आहे. ती खूपच आश्चर्यकारकरीत्या मोठी झाली आहे. आणि तिच्यात आत्मविश्वास आल्याचं तिच्या फोटोतून दिसत आहे. ही सुंदर मुलगी लवकरच चित्रपटात पाहायला मिळेल", अशी प्रतिक्रिया मसाबा गुप्तांनी व्यक्त केली आहे.