Join us  

देवदत्त नागे पुन्हा छोट्या पडद्यावर झळकणार, त्यासाठी घेतोय इतकी मेहनत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 4:20 PM

देवदत्त नागे गेल्या कित्येक दिवसांपासून कोणत्या चित्रपटात अथवा मालिकेत झळकलेला नाहीये. पण त्याच्या फॅन्ससाठी एक गुड न्युज आहे. तो लवकरच पुन्हा छोट्या पडद्यावर एक वेगळी भूमिका साकारणार आहे.

'जय मल्हार'  या मालिकेतील खंडेराया या भूमिकेमुळे देवदत्त नागे हे नाव घराघरात पोहोचले. त्याच्या जय मल्हार या मालिकेने २०१७ साली ब्रेक घेतला. तरी आजही प्रेक्षकांच्या मनात ही मालिका आणि ती व्यक्तिरेखा ताजी आहे. या मालिकेला प्रेक्षकांनी भरपूर प्रेमही दिले होते. खंडोबा या व्यक्तिरेखेला तर चाहत्यांचे आणि खंडोबाच्या भक्तांचे विशेष प्रेम लाभले होते. अतिशय पिळदार शरीरयष्टी असेलला देवदत्तने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. 

तान्हाजी मालसुरे यांच्या आयुष्यावर आधारित 'तान्हाजी' या चित्रपटात  देवदत्त नागे सूर्याजी मालसुरे ही  एक महत्वाची भूमिका करत आहे. नुकत्याच तानाजी साठी दिलेल्या एका इंटरव्यू मध्ये त्याने तो पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर येत आहे असे सांगितले.' मी जो कोणी आहे तो छोट्या पडद्यामुळे' अशी प्रांजळ प्रतिक्रिया देत देवदत्तने छोटा पडदा हे माझं पाहिलं प्रेम आहे. देवदत्त नागे गेल्या कित्येक दिवसांपासून कोणत्या चित्रपटात अथवा मालिकेत झळकलेला नाहीये. पण त्याच्या फॅन्ससाठी एक गुड न्युज आहे. तो लवकरच पुन्हा छोट्या पडद्यावर एक वेगळी भूमिका साकारणार असल्याचे त्याने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे. 

सध्या या नव्या प्रोजेक्टसाठी तो त्याचा एक वेगळा लुक बनवत आहे. त्यासाठी त्याने त्याच्या केसांची पोनी सुद्धा वाढवली आहे. अतिशय पिळदार शरीरयष्टी आणि केसांची पोनी वाढवलेला देवदत्त नागे जय मल्हार नंतर छोट्या पडद्यावर कोणत्या प्रकारची भूमिका करेल आणि मुख्य म्हणजे हे त्याचे सिक्रेट प्रोजेक्ट कधी छोट्या पडद्यावर येईल हे पाहणे त्याच्या चाहत्यांसाठी एक विशेष  पर्वणीच असणार आहे. 

 

टॅग्स :देवदत्त नागेजय मल्हार