बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूरला लहानपणी शाळेत जायला आवडत नसे, सरासरी दर्जाची विद्यार्थिनी असल्याने करिनाला अभ्यासात नेहमीच समस्या येत असे. भारतात शिक्षणासाठी युनिसेफची सेलिब्रिटी दूत असलेल्या करिनाच्या मते लहानपणी तिला शिक्षकांकडून फारसे महत्त्व मिळाले नाही. कारण ती कधीच वर्गात पुढच्या बाकावर बसत नसे. करिना म्हणाली की, ‘शाळेत जाण्यासाठी आई मला दररोज सहा वाजता उठवत असे आणि माङो तिला दररोज उत्तर असे, आणखी एक तास. वयाच्या दहाव्या वर्षी मला वाटत होते की, माङया शाळेचे दप्तर खूप जड आहे. मी वर्गात झोपून जात असे, सरासरी विद्यार्थी असल्याने मला शाळेत भाव मिळत नसे. आता मात्र करिनाला पुन्हा एकदा शाळेत जायची इच्छा आहे.