Join us

डिप्पी कॅन्सरग्रस्त मुलीच्या भूमिकेत!

By admin | Updated: July 16, 2015 05:14 IST

दीपिका पादुकोण नुकतीच तिच्या कुटुंबियांसोबत विम्बलडन येथे फायनल मॅच एन्जॉय करून परतली आहे. बॉलीवूडमधील सर्वांत बिझी हिरोईनपैकी एक असलेली

दीपिका पादुकोण नुकतीच तिच्या कुटुंबियांसोबत विम्बलडन येथे फायनल मॅच एन्जॉय करून परतली आहे. बॉलीवूडमधील सर्वांत बिझी हिरोईनपैकी एक असलेली ‘डिप्पी’ लवकरच होमी अडाजनिया यांच्या नव्या प्रोजेक्टवर काम करणार आहे. जॉन ग्रीन यांचे २०१२ चे तुफान विक्री झालेले पुस्तक ‘द फॉल्ट इन आर स्टार्स’ यावर इंडियन रीमेक बनवणार आहे. यात ते त्यांची आवडती हिरोईन दीपिकाची मुख्य भूमिकेसाठी निवड करणार आहेत. या पुस्तकाच्या थीमवर हॉलिवूडमध्ये एक चित्रपट बनला आहे. होमी गेल्या एक वर्षापासून याच प्रोजेक्टवर काम करत आहेत. आणि आता त्यांची स्क्रिप्ट फायनल झाली आहे. ही कथा कँ न्सरग्रस्त युवतीची आहे, तिला तिचे पालक एका सपोर्ट ग्रुपसोबत राहण्यासाठी तयार करतात. तिथे तिची भेट आणखी एका कँन्सरपेशंटसोबत होते. त्या दोघांमध्ये प्रेम होते. हा चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित करण्याचा प्लॅन आहे. अद्याप मुख्य भूमिकेतील अभिनेत्याची निवड झालेली नाही.