Join us

हॉलीवूडसाठी दीपिकाची ‘कसरत’

By admin | Updated: January 30, 2016 03:17 IST

‘पि कू’, ‘तमाशा’, ‘बाजीराव मस्तानी’ अशा बॅक टू बॅक सुपरहिट चित्रपटांमुळे दीपिका जाम खूश आहे. परंतु तरीदेखील ती आराम करण्याच्या मन:स्थितीत दिसत नाहीए.

‘पि कू’, ‘तमाशा’, ‘बाजीराव मस्तानी’ अशा बॅक टू बॅक सुपरहिट चित्रपटांमुळे दीपिका जाम खूश आहे. परंतु तरीदेखील ती आराम करण्याच्या मन:स्थितीत दिसत नाहीए. बॉलीवूडनंतर आता तिने हॉलीवूडवर नजर रोखली आहे. हे तर सगळ्यांनाचा माहिती आहे, की दीपिका ‘फास्ट अँड फ्युरिअस’फेम विन डिजलसोबत ‘ट्रिपल एक्स’ नावाच्या हॉलीवूड सिनेमात झळकणार आहे. रोलसाठी तिने आतापासूनच फिटनेसवर काम करणे चालू केले आहे. भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी दीपिका लागेल ती मेहनत घ्यायला तयार आहे, असे तिची ट्रेनर यास्मिन कराचीवालाने सांगितले. दीपिका कसरत करतानाचा व्हिडीओदेखील तिने शेअर केला आहे. प्रियंका चोप्रासारखे आपणही हॉलीवूडमध्ये डंका वाजवायचा, असा तर तिने चंग बांधला नसेल ना!