ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - चेन्नई एक्स्प्रेस, बाजीराव मस्तानी सारखे एकाहून एक हिट चित्रपट देणारी अभिनेत्री दीपिका पदूकोण लवकरच हॉलिवूड चित्रपटातून लोकांना पाहायला मिळणार आहे. दीपिका पदूकोणचा पहिला हॉलिवूड चित्रपट 2017मध्ये पहिल्यांदा भारतात प्रदर्शित होणार आहे. दीपिका पदूकोणनं ट्विटरवरून याची माहिती दिली आहे.XxX:The Return of Xander Cage भारतात इतर देशांच्या तुलनेत पहिल्यांदा प्रदर्शित होणार आहे. 14 जानेवारी 2017पासून हा चित्रपट भारतीय सिनेमागृहात प्रदर्शित होईल, असं तिने ट्विटमध्ये म्हटलं आहे. विशेष म्हणजे मस्तानीबाई या हॉलिवूडपटात खतरनाक अॅक्शन प्ले करताना दिसणार आहे. या हॉलिवूडपटाच्या ट्रेलरमध्ये सेरेना(दीपिका पदूकोण) हटके अंदाजात लोकांसमोर येणार आहे. हॉलिवूड अभिनेता विन डिझेलसोबत तिला जबरदस्त स्टंट सीन्समध्ये दाखवण्यात आलं आहे. एकंदरीतच दीपिका पदूकोणच्या अभिनयावरून ती हॉलिवूड अभिनेत्री असल्याचा भास होत असून, हा हॉलिवूडचा डेब्यू चित्रपट असल्याचं वाटत नाही. या चित्रपटात रुबी रोज, सम्यॅुअल एल जॅक्शन, डॉनी येन आणि टोनी जा हे मुख्य भूमिकेत असणार आहे. XxX:The Return of Xander Cage हा चित्रपट 2002मधल्या xxx आणि 2005मध्ये प्रदर्शित झालेल्या 'XXX: State of the Union' या चित्रपटांचाच सिक्वल आहे.
thrilled to announce that #XxX:TheReturnofXanderCage will release in India first!before anywhere else in the world! #14thJanuary#VinDieselpic.twitter.com/8y36pMYQBF— Deepika Padukone (@deepikapadukone) 28 December 2016