दीपिका पादुकोण ख्रिसमस सेलीब्रेशनसाठी कुटुंबीयांसमवेत मालदीवला गेली. त्यानंतर आता रणवीर सिंगदेखील मालदीवला पोहोचला असून, हे दोघे तिथे नवीन वर्षाचे स्वागत करणार आहेत. ‘बाजीराव मस्तानी’चे चित्रीकरण पूर्ण करून रणवीर मालदीवला पोहोचला आहे. इब्राहीम नासीर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दीपिका आणि रणवीरचे छायाचित्र सध्या सोशल मीडियावर फिरत आहे.