Join us

दीपिका व रणवीरचं अखेर ठरलं?, सुरू झाली लग्नाची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2018 12:55 IST

हे दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचंही बोललं जातं आहे.

मुंबई- बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडी दीपिका पादूकोण व रणवीर सिंह यांच्या लग्नाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा आहे. हे दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचंही बोललं जातं आहे पण या वृत्ताला दीपिका किंवा रणवीरपैकी कुणाकडूनही दुजोरा मिळाला नाही. पण आता पुन्हा एकदा दोघांच्या लग्नाच्या चर्चेला उधाण आलं आहे. दोघांच्या लग्नाची तयारीही सुरू झाल्याचं समजतं आहे. रणवीर व दीपिकाच्या आई-वडिलांनी तीन-चार महिन्यांच्या आत दोघांचा विवाह निश्चित केला आहे. स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार, दीपिका व रणवीर पुढील 3-4 महिन्यात लग्न करणार असल्याचं त्यांना समजलं आहे. 

लग्नाची बोलणी करण्यासाठी दीपिकाचे आई-वडील गेल्या आठवड्यात बंगळुरूहून मुंबईत आले होते. त्यावेळी दीपिका-रणवीरच्या लग्नाची तारीख ठरल्याचं बोललं जातं आहे. दीपिकाच्या प्रभादेवी येथिल घरी ही बैठत झाली. बैठकीला दीपिका व रणवीर त्यांच्या आई-वडिलांसह हजर होते. बैठकीनंतर रणवीर व दीपिका सहकुटुंब वरळीमध्ये जेवायलाही गेले. 

दीपिका पादूकोण व रणवीर सिंह या दोघांनाही डेस्टिनेशन वेडिंग करायचं आहे. पण दोघांचं लग्न मुंबईत व्हावं, अशी त्यांच्या कुटुंबीयांची इच्छा आहे. दीपिका व रणवीरचे नातेवाईक व मित्रपरिवार मुंबई व दिल्लीमध्ये आहे. त्यामुळे त्यांनी लग्नाला हजर राहावं, यासाठी मुंबईत लग्न करण्याची त्यांची इच्छा आहे. 

सुत्रांच्या माहितीनुसार, दीपिका-रणवीरचं लग्न साऊथ इंडियन पद्धतीने केलं जाईल. मुंबईतील एखाद्या हायप्रोफाइल ठिकाणी लग्न सोहळा पार पडेल. तसंच  ग्रॅण्ड रिसेप्शन दिलं जाणारे. दीपिका लग्नाच्या शॉपिंगमध्ये व्यस्त झाली असून ती 2 मार्च रोजी लंडनला शॉपिंगसाठी गेली होती.  दरम्यान, या वृत्ताला दीपिरा व रणवीर दुजोरा देतात का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.