Join us  

'ढिशूम'ने तीन दिवसात कमावले ३७ कोटी

By admin | Published: August 01, 2016 1:32 PM

वरुण धवन आणि जॉन अब्राहमची मुख्य भूमिका असलेल्या 'ढिशूम' चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर चांगली सुरुवात केली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १ - वरुण धवन आणि जॉन अब्राहमची मुख्य भूमिका असलेल्या 'ढिशूम' चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर चांगली सुरुवात केली आहे. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या तीन दिवसात ढिशूमने ३७ कोटींची कमाई केली आहे. कॉमेडी आणि अॅक्शन सीन्सनी भरलेला ढिशूम एक मसालेदार चित्रपट आहे. 
 
मनोरंजनाच्या आघाडीवर ढिशूमने प्रेक्षकांना नाराज केले नाही. त्यामुळे तिकीट खिडकीवर या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी टि्वटरवरुन ढिशूमची तीन दिवसांची कमाई जाहीर केली आहे. रोहित धवनचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात अक्षय खन्नानेही चांगली भूमिका केली आहे. 
 
आणखी वाचा 
 
चित्रपटाचे कथानक
ढिशुमची कथा इतर सर्वसामान्य मसालापटांसारखीच आहे. इंडिया पाकिस्तानमधील महत्त्वाच्या मॅचच्या पुर्वसंध्येला भारताचा टॉप बॅट्समन विराज शर्मा (साकिब सलीम) किडनॅप होतो. त्याला शोधण्याची जबाबदारी कबीर शेरगील (जॉन अब्राहीम) आणि जुनैद अन्सारी (वरून धवन) यांच्यावर सोपवली जाते. मग सुरु होते ३६ तासांची शोधमोहीम. या मोहिमेत विराज शर्माच्या शोधात ते अबु धाबीला पोचतात. मग तिथे त्यांची इशिका (जॅकलिन फर्नाडिस) या ड्रग डीलरशी भेट होते आणि मग पुढे कशाप्रकारे हे सर्वजण विराज शर्माला वाघाच्या तावडीतून (अक्षय खन्ना) सोडवतात याचा जुनाट आणि वर्षानुवर्षे घासून गुळगुळीत झालेल्या फॉर्मुल्यावर आधारित दर्शन म्हणजे ढिशुम. हे कथानक वरकरणी मनोरंजक वाटत असले तरी सिनेमा बघताना त्यात काही नाविन्य जाणवत नाही.