येत्या शुक्रवारी म्हणजे २९ जानेवारीला ‘साला खडूस’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. यामध्ये आर. माधवन बॉक्सिंग कोचच्या भूमिके त आहे. यात तो एकदम अँग्री एंग मॅन दिसला आहे. याच क्रमात यशराजचा आगामी चित्रपट ‘सुल्तान’मध्ये रणदीप हुडा याला कोचच्या भूमिकेत कास्ट करण्यात आल्याचे वृत्त आहे. या चित्रपटात हुडा सलमानला कुस्तीचे डावपेच शिकवणार आहे. बॉलीवूडमध्ये कोचची पात्रे तशी जास्त जास्त नाहीत. मात्र, ज्यांनीही ही भूमिका केली आहे, त्यांनी त्या भूमिकेचे अक्षरश: सोने केले आहे. यात एक नाव सर्वप्रथम समोर येते, ते म्हणजे शाहरूख खानचे. यशराजच्या ‘चक दे’मध्ये महिला हॉकी टीमच्या कोचची भूमिका त्याने अगदी अप्रतिम साकारली होती. ही भूमिका आधी सलमान खानला आॅफर करण्यात आली होती. मात्र, गोष्ट काही पुढे वाढली नाही. ‘चक दे’मधील शाहरूखच्या पात्राला त्याच्या करिअरचा उत्कृष्ट रोल मानला जातो. नागेश कुन्नूरच्या ‘इकबाल’ चित्रपटात नसीरुद्दीन शाह यांनी एक अशा क्रिकेट कोचची भूमिका निभाविली, जे एका मुक्या बहिऱ्या तरुणाचे भारतीय क्रिकेट टीमचा गोलंदाज बनण्याचे स्वप्न पूर्ण करतात. राकेश ओमप्रकाश मेहराच्या ‘भाग मिल्खा भाग’मध्ये मिल्खा सिंगच्या कोचच्या दोन भूमिका होत्या, त्या पवन मल्होत्रा आणि योगराज सिंह (क्रिकेटर युवराज सिंह) च्या वडिलांनी साकारल्या होत्या.
- anuj.alankar@lokmat.com