‘पोश्टर गर्ल’ आणि ‘पोश्टर बॉईज’ सिनेमानंतर समीर पाटील आता मनोरंजनाबरोबरच ‘सेंटीमेंटल’ करायला ‘शेंटीमेंटल’ हा चित्रपट घेऊन येत आहेत. समीर पाटील त्यांच्या चित्रपटातील कंटेंटसाठी प्रसिद्ध तर आहेतच पण चित्रपटाच्या नावांमध्ये आढळणाऱ्या खास गावरान बाजासाठीदेखील ते प्रसिद्ध आहेत. या बद्दल विचारले असता ते म्हणाले की, सिनेमा या शब्दापेक्षा जसा ‘शिनेमा’ हा शब्द जास्ती जवळचा वाटतो तसेच पोस्टर, सेंटीमेंटल या शब्दांपेक्षा ‘पोष्टर’, ‘शेंटीमेंटल’ हे शब्द जास्ती जवळचे, आपल्या मातीतले वाटतात. आणि चित्रपट जर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचा असेल त्यातील भाषा, कंटेंट लोकांना आपलासा वाटायला हवा आणि हेच आपलेपण जपण्यासाठी चित्रपटाचे नाव ‘शेंटीमेंटल’ आहे!
प्रेक्षकांना सेंटीमेंटल करण्यासाठी ‘शेंटीमेंटल’!
By admin | Updated: July 16, 2017 02:30 IST