Join us

परिणिती-प्रियंका मुकाबला टळला

By admin | Updated: August 12, 2014 14:43 IST

बॉलीवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि तिची बहीण परिणिती चोप्रा यांचे चित्रपट आता बॉक्स ऑफिसवर एकमेकांशी टक्कर घेणार नाहीत.

बॉलीवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि तिची बहीण परिणिती चोप्रा यांचे चित्रपट आता बॉक्स ऑफिसवर एकमेकांशी टक्कर घेणार नाहीत. प्रियंकाचा ‘मेरी कोम’ हा चित्रपट ५ सप्टेंबरला रिलीज होणार आहे. यात तिने भारतीय महिला बॉक्सर मेरी कोमची भूमिका साकारली आहे. याच दिवशी परिणितीचा ‘दावत-ए-इश्क’ हा चित्रपट रिलीज होणार होता; पण आता हा चित्रपट १९ सप्टेंबरला रिलीज करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. प्रोडक्शन टीमच्या मते, या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आणखी काही वेळ लागणार आहे. यशराज बॅनरच्या या चित्रपटात परिणिती चोप्रासह आदित्य रॉय कपूर, अनुपम खेर आणि करण वाही यांच्या मुख्य भूमिका आहेत. परिणितीचा ‘शुद्ध देसी रोमांस’ आणि प्रियंकाचा ‘जंजीर’ हे चित्रपट मागील वर्षी एकाच दिवशी रिलीज झाले होते. त्यात ‘शुद्ध देसी रोमांस’ने बाजी मारली होती. यावेळी प्रियंकाचे पारडे जड असल्याने ‘दावत-ए-इश्क’च्या टीमने चित्रपट ५ सप्टेंबरला रिलीज न करण्याचा निर्णय घेतला आहे.